“वैद्यकीय शिक्षण मंत्री गो बँक” चंद्रपूर डेरा आंदोलनातील महिला कर्मचाऱ्यांच्या भावनांचा उद्रेक
अखेर वैद्यकीय शिक्षण मंत्री देशमुख यांनी आटोपती घेतली बैठक; वैद्यकीय शिक्षण मंत्री यांच्या पुढेच लागले नारे “शिक्षण मंत्री गो बँक”
✒मनोज खोब्रागडे✒
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर :- मागील तीन महिन्यांपासून जिल्हाधिकारी कार्यालयापुढे उभारलेल्या डेरा आंदोलकांच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील कंत्राटी कामगारांच्या भावनांचा आज मंगळवारी पुन्हा एकदा संतप्त उद्रेक पहायला मिळाला. जिल्हाधिकारी कार्यालया जवळील नियोजन भवनात आयोजित पत्रकार परिषदेत वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख याच्या पुढेच सात महिण्याच्या थकीत पगाराची मागणी करण्यात आली. यावेळी महिला आंदोलक ढसाढसा रडायला लागल्या. मंत्री महोदयांच्या पुढे गो बॅकचे नारे लावण्यात आले. त्यामुळे मंत्र्यांना पत्रकार परिषद आटोपती घ्यावी लागली. शेवटी देशमुख यांना घेराव करण्यात आल्याचा प्रसंग आज मंगळवारी चंद्रपुरात पहायला मिळाला.
आज मंगळवारी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख हे चंद्रपूरच्या दौऱ्यावर होते. जिल्हाधिकारी कार्यालया जवळील नियोजन भवन येथे अमित देशमुख यांची पत्रकार परिषद सुरू असताना मागील बाकावर बसलेल्या तीन कोविड योध्द्या महिला कामगारांनी थकीत पगाराबाबत मंत्री देशमुख यांना विचारणा केली. यावर त्यांनी फारसा प्रतिसाद न दिल्याने महिला कामगार चांगल्याच संतापल्या. महिला कामगार थकित पगारासाठी ढसाढसा रडायला लागल्या. कामगारांचा उद्रेक पाहून अखेर वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख आणि त्यांचे सोबत असलेले पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचे सह आंदोलकांचा रौद्ररूप पाहून नियोजन भवनातून पत्रकार परिषद आटोपती घेतली.
नियोजन भवनातून बाहेर निघत असताना कंत्राटी कामगारांनी अमित देशमुख यांना घेराव केला.
गो-बॅक अमित देशमुख,’थकीत पगार द्या,मगच जिल्ह्यात या,असे नारे लावण्यात आले. चिघळत चाललेली परिस्थिती बघता वैद्यकीय शिक्षण मंत्री देशमुख यांनी पोलिसांच्या सुरक्षेमध्ये काढता पाय घेतला.