मिशन धारावी; धारावीत लसीकरणाच्या जनजागृतीसाठी भारतीय जैन संघ पोहचतोय घरोघरी.
मिशन धारावी; धारावीत लसीकरणाच्या जनजागृतीसाठी भारतीय जैन संघ पोहचतोय घरोघरी.

मिशन धारावी; धारावीत लसीकरणाच्या जनजागृतीसाठी भारतीय जैन संघ पोहचतोय घरोघरी.

मिशन धारावी; धारावीत लसीकरणाच्या जनजागृतीसाठी भारतीय जैन संघ पोहचतोय घरोघरी.
मिशन धारावी; धारावीत लसीकरणाच्या जनजागृतीसाठी भारतीय जैन संघ पोहचतोय घरोघरी.

नीलम खरात, मुंबई प्रतिनिधी✒
मुंबई,दि.27 एप्रिल :- धारावी म्हटलं की आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी येथे कमीतकमी 55 हजाराच्या आसपास झोपड्या असतील,15 लाख लोकवस्ती असलेली धारावी ही गेल्यावेळी कोरोनाचा हॉटस्पॉट ठरली होती. मुंबईसह संपूर्ण देश हादरला होता. पण हीच धारावी पुढे कोरोनामुक्तीकडे वाटचाल करताना ‘धारावी पॅटर्न’ म्हणून नावलौकिक मिळवायला लागली.बघताबघता जागतिक आरोग्य संघटनेला याबाबीची दखल घ्यावी लागली.आणि धारावी जागतिक दर्जाच्या स्पर्धेत आली.

सध्या देशात कोरोनाची दुसरी लाट आली पण धारावी यातून सावरतेय, मुंबईत उपनगरांमध्ये कोरोनाबधितांची संख्या वाढतेय, इतर अनेक ठिकाणी कोरोना वाढताना दिसतोय पण धारावीतील प्रमाण गेल्यावेळी पेक्षा सर्वात कमी आहे. त्यामध्येच सध्या महाराष्ट्र शासनाच्या आणि मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने भारतीय जैन संघटना धारावीतील घराघरात विविध माध्यमाद्वारे पोहचत आहे. भारतीय जैन संघटना ही धारावीत जनजागृती करण्यात यशस्वी होताना दिसत आहे. मनपाच्या ग/उत्तर विभाग आणि धारावी पोलीस ठाणे यांच्या सहकार्याने धारावीतील गल्लोगल्ली, नाकानाक्यावर पथनाट्य, ध्वनिक्षेपणाच्या विविध संदेशाच्या माध्यमातून प्रचार आणि प्रसार स्वखर्चाने वेगवेगळ्या टीम तयार करून धारावीतील प्रत्येक वॉर्डाच्या चाळीमध्ये घरोघरी पोहचून लसीकरण नोंदणी करून घेणे, धारावीतील सार्वजनिक गणेशोत्सव, नवरात्रोस्तव मंडळांना हाताशी धरून प्रत्येक विभागात मोफत आरोग्य शिबीर आयोजित करत आहे.लोकांना मोफत औषध वाटप करत आहेत. त्यांच्या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

भारतीय जैन संघटना ही संस्था,पुणे येथून मुंबईतील धारावी महावीर भवन येथून हे सामाजिक कार्य करत आहे. कोणतेही राजकारण न करता फक्त आणि फक्त धारावीतील प्रत्येक नागरिक कोरोनापासून वाचला पाहिजे त्याचबरोबर त्याचे लसीकरण नोंदणी करून त्यांना लसीकरण केंद्रापर्यंत सोडून त्याचे लसीकरण करण्यापर्यंत त्यांना सेवा देत आहे.याला धारावीतील अनेक संस्था,मंडळे, पत्रकार देखील सहकार्य करत आहेत.धारावी मिशनच्या माध्यमातून माझी धारावी,माझी जबाबदारी ही संकल्पना लोकांच्या मनात रुजवण्याचे काम संघटनेच्या माध्यमातून होत असल्याने धारावीतील सर्वसामान्य बांधव मनापासून सहकार्य करत आहेत. व त्याचे आभार व्यक्त करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here