आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांचा गडचिरोली जिल्हा दौरा.

✒मनोज खोब्रागडे✒
गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली,(जिमाका)दि.27:- इमाव बहुजन कल्याण विभाग, खार जमिनी विकास, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार बुधवार, दि. 28 एप्रिल 2021 रोजी दुपारी गडचिरोली येथे कोरोना परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. दुपारी गडचिरोली सामान्य रुग्णालय व कोव्हीड सेंटरला भेटही देणार आहेत. सायं.जिल्हाधिकारी कार्यालय येथे कोव्हिड आढावा बैठक व रात्री मुक्काम आहे. गुरुवार, दि. 29 एप्रिल 2021 रोजी गडचिरोली येथून चंद्रपूरकडे रवाना होतील.