भावानेच केली सख्या भावाची हत्या

भावानेच केली सख्या भावाची हत्या

भावानेच केली सख्या भावाची हत्या

हेमा मेश्राम
दुर्गापूर शहर प्रतिनिधी
मो.9356653707

दुर्गापूर:- चंद्रपूर मधील दुर्गापूर पोलिस स्टेशन हद्दीत असलेल्या वॉर्ड नो.5 कोंडी येथील प्रदीप कोवे या इसमाची मंगळवार 26/04/2022 ला त्याच्या राहत्या घरी त्याचाच लहान भाऊ जगदीश कोवे याने कुऱ्हाडीने वार करून त्यांची मोठा भाऊ प्रदीप याची हत्या केली.प्रदीप हा 42 वर्षाचा असून तो घरी रोज दारू पिऊन यायचा व घरच्यांना शिवीगाळ व मारहाण करायचा,त्याला वॉर्ड मध्यल्या लोकांनी त्याला खूप समजवायचा प्रयत्न केला तरी सुध्धा तो मुद्दामून लोकांशी व घरच्याची भांडण करायचा,त्याला कंटाळून त्याला प्रतिबंध म्हणुन पोलिस स्टेशन दुर्गापूर येते त्याची कंप्लेंट सुध्धा केली,त्या नंतर दुर्गापूर पोलिस स्टेशन नी त्याला प्रतिबंध लावला तरी सूद्धा प्रदीप ऐकत नव्हता त्याच्या ह्या त्रासाला कंटाळून त्याचा लहान भाऊ जगदीश ह्याने त्याची कुऱ्हाडीने वार करून प्रदीप ची हत्या केली.पोलिस स्टेशन दुर्गापूर कर्मचाऱ्यांना जगदीश ला पकडुन त्या वर कलम लावून पुढील तपास सुरू आहे.