सावली (वाघ) येथे सिलेंडरच्या स्फोटामुळे लागली आग. आगीत पाच घरे जळून खाक.

सावली (वाघ) येथे सिलेंडरच्या स्फोटामुळे लागली आग.

आगीत पाच घरे जळून खाक.

सावली (वाघ) येथे सिलेंडरच्या स्फोटामुळे लागली आग. आगीत पाच घरे जळून खाक.

✒करण विटाळे✒
हिंगणघाट तालुका ग्रामीण
प्रतिनिधी:8806839078

हिंगणघाट: तालुक्यातील सावली (वाघ) येथे तुकारामजी नांदे यांच्या घरी सिलेंडरचा अचानक स्पोट झाल्यामुळे एकुण पाच घरांना आग लागली आहे. व पाचही घरातील संपूर्ण साहित्य , अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंची राखरांगोळी होउन कुटुंब रस्त्यावर आले आहे.
सावली येथील रहिवासी तुकारामजी नांदे यांच्या घरी सिलेंडरचा अचानक स्पोट झाला, हा स्पोट एवढा भिषण होता कि अवघ्या काही मिनिटातच आगीने आपले रौद्ररूप धारण केले व शेजारी असलेल्या मधुकर दोडके यांच्या घरांला आग लागली व तिथेही सिलेंडरचा स्पोट झाला आणि क्षणातच रूषी मगरे , आशा दोडके यांच्या घरांना आग लागली. आगीचे लोळ दिसताच गावकऱ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला परंतु आग आटोक्यात आली नसता त्वरित अग्निशमन दलाला फोन केला व अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक परिश्रम करून व गावकऱ्यांच्या मदतीने आग आटोक्यात आणली.
या आगीमध्ये तुकारामजी नांदे यांच्या घरातील लॉकरमध्ये ठेवून असलेले रोख तिन लाख रुपये व एक मोटारसायकल संपूर्ण जळून खाक झाली आहे. त्याचप्रमाणे मधुकर दोडके, आशा दोडके, रूषी मगरे, यांचेही आगीमध्ये लाखो रूपयांची नुकसान झाली आहे. व हे चारही कुटुंब आज रस्त्यावर आलेले असून त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. घटनेची माहिती पोलीसांना मिळतात पोलीसांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली व संपूर्ण घटनेचा पंचनामा करून घेतला. व हिंगणघाटचे नायब तहसीलदार, समशेर पठाण साहेब यांनीही सावली (वाघ) येथे येउन घटनेतची पाहणी केली व नुकसानग्रस्त पाचही कुटुंबीयांचे सांत्वन करून त्यांना तातपूरते धान्य वाटप केले आहे. या घटनेने गावातील संपूर्ण लोकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे व गावकऱ्यांनी नुकसानग्रस्त कुटुंबियांना लवकरात लवकर मदत मिळावी अशी प्रशासनाकडे मागणी केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here