महसूल मंत्री राधाकृष्ण विखेंच्या कार्यालयावर धडकणार शेतकऱ्यांचे लाल वादळ !
जितेंद्र कोळी
पारोळा प्रतिनिधी
मो:9284342632
राज्याचे महसुलमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या कार्यालयावर शेतकऱ्यांच्या विविध प्रशांसाठी किसान सभेेचे नेते अजित नवले हे हजारो शेतकऱ्यांसोबत घेऊन लाल वादळ घेऊन निघाले आहेत. हजारो शेतकरी हे अहमदनगर तालुक्यातील अकोले येथून या मोर्चात सहभागी झाले आहेत.
शेतकरी आणि कामगारांचे प्रश्न सरकारला कळावेत म्हणून हा मोर्चा असणार आहे. महसूल मंत्री विखे यांच्यासोबत चर्चा निष्फळ ठरल्याने अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने अकोले ते लोणी असा मोर्चा काढण्यात येणार आहे.
आज म्हणजे बुधवारपासून सुरु झालेला हा पायी मोर्चा २८ एप्रिलला लोणी येथी महसुलमंत्री राधाकृष्ण विखेच्या कार्यालयावर जाऊन धडकणार आहे. पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा एल्गार होणार असून आजपासून पुढचे तीन दिवस शेतकऱ्यांच्यावतीनं अकोले ते लोणी पायी लॉंग मार्च काढण्यात येणार आहे. दुपारी 3 वाजता अकोले शहरातून या मोर्चाला सुरूवात होणार आहे. विविध मागण्यांसाठी हा मोर्चा निघणार आहे.