कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत नेतेमंडळींना करावे लागणार आहे ‘महत्त्वाचं’ नियोजन !

जितेंद्र कोळी

पारोळा प्रतिनिधी 

मो -9284342632

मुंबई – कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या निवडणुकीत एक- एक मत महत्वाचे आहे. अशातच मतदार यादीत दोनदा नाव असणार्‍या मतदारांना राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाने चांगलाच झटका दिला आहे. यादीत दोनदा नाव असले तरी त्या मतदाराला दोनदा नव्हे तर एकदाच मतदान करण्याचा अधिकार मिळणार आहे. या निर्णयामुळे नेते मंडळींना डबल नाव असणार्‍या मतदाराचे मत कोणत्या मतदारसंघात घडवून आणायचे, याचे नियोजन करावे लागणार आहे.

एखाद्या मतदानाचे नाव एकाच मतदारसंघाच्या मतदार यादीत एकापेक्षा जास्त वेळा समाविष्ट असल्यास संबंधित मतदाराला त्या मतदारसंघात निवडून द्यावयाच्या सदस्य संख्येइतके मतदान करता येणार आहे. त्यामुळे संबंधित मतदाराला एकाच वेळी मतदान करता येणार असल्याचे प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे.

एखाद्या मतदाराचे नाव एकापेक्षा जास्त मतदारसंघाच्या मतदार यादीत समाविष्ट असल्यास त्या मतदाराला एकापेक्षा अधिक मतदारसंघात मतदान करता येणार नसल्याचे प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे. अनेक मतदार हे ग्रामपंचायत सदस्य असून ते गावातील सेवा सहकारी सोसायटीचे देखील संचालक आहेत. त्यामुळे अशा मतदारांना एकापेक्षा जास्त मतदारसंघात मतदान करु द्यायचे की कसे, याविषयी प्राधिकरणाने मार्गदर्शन मागितले होते. मतदाराने त्याचे नाव असलेल्या मतदारसंघात म्हणजे ग्रामपंचायतमध्ये चार किंवा सोसायटी मतदारसंघात ११ संचालकपदांसाठी मतदान केले तरी हे मतदान एकच गृहीत धरण्यात येईल व त्याला एकापेक्षा जास्त मत देता येणार नाही, असे राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे.

राज्यात बाजार समितीच्या निवडणुका चुरशीच्या होत आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील १४ बाजार समित्यांची निवडणूक प्रक्रिया सुरु असून २८ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. मतदार यादीमध्ये ग्रामपंचायत आणि सोसायटी मतदारसंघात दोन्ही ठिकाणी अनेकांची मतदार यादीत नावे आहेत. काहींची सोसायटी व व्यापारी मतदारसंघात आहेत. काहींची ग्रामपंचायत व व्यापारी मतदारसंघात आहेत. एकाच माणसाची दोन मतदारसंघात नावे आहेत. अशा मतदारांना एकाच मतदारसंघात मतदान करता येणार आहे.

दोन्ही ठिकाणी मतदान केल्यास एकाच ठिकाणचे मत गृहित धरले जाणार आहे. त्यामुळे बाजार समितीच्या निवडणुकीत नेते मंडळींना सत्ता ताब्यात ठेवण्यासाठी मतदारसंघ कोणता महत्वाचा आहे, कोणत्या मतदारसंघात अडचण आहे, हे पाहून मतदारसंघ महत्वाचा कोणता हे पाहून डबल मतदान असणार्‍या मतदाराचे आपल्याला अडचण असलेल्या मतदारसंघात मतदान घडवून आणावे लागणार आहे. यासाठी नेतेमंडळींना मोठी कसरत करावी लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here