घरकुल चे बिल वेळेवर न मिळाल्यास लार्भात्याने दिला आत्महत्याचा इशारा सिंदेवाहीचे गटविकास अधिकारी अक्षय सूक्रे आत्महत्येस जबाबदार

घरकुल चे बिल वेळेवर न मिळाल्यास लार्भात्याने दिला आत्महत्याचा इशारा

सिंदेवाहीचे गटविकास अधिकारी अक्षय सूक्रे आत्महत्येस जबाबदार

घरकुल चे बिल वेळेवर न मिळाल्यास लार्भात्याने दिला आत्महत्याचा इशारा सिंदेवाहीचे गटविकास अधिकारी अक्षय सूक्रे आत्महत्येस जबाबदार

अमान क़ुरैशी
सिंदेवाही तालुका प्रतिनिधि
मो,8275553131

सिंदेवाही :- शासनाच्या विविध योजनेमार्फत सध्या घरकुल योजनेची खैरात वाटल्या जात असून सिंदेवाही पंचायत समिती अंतर्गत असलेल्या सिंगडझरी येथील लाभार्थी हरी गोमा मेश्राम यांना प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घरकुल मंजूर झाले. मात्र घरकुलाचे बांधकाम करूनही पुढील कोणतेही हप्ते न मिळाल्याने हताश झालेला लाभार्थी हरी गोमा मेश्राम यांनी बिल न मिळाल्यास आत्महत्या करण्याचा इशारा दिला असून सिंदेवाहीचें गटविकास अधिकारी हेच माझ्या आत्महत्येस जबाबदार असतील, असे दिलेल्या निवेदनातून सांगितले आहे.
सिंदेवाही पंचायत समिती अंतर्गत सिंगडझरी येथील लाभार्थी हरी गोमा मेश्राम यांना सन २०२१-२२ या वर्षात प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घरकुल मंजूर करण्यात आले. व बांधकाम करण्यास २० हजार रुपयांचा पहिला हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला. त्यानुसार लाभार्थी हरी गोमा मेश्राम यांनी घरकुल बांधकाम करण्यास सुरुवात केली. पायव्याचे बांधकाम झाल्यानंतर पुढील हप्ता मिळण्यासाठी पंचायत समिती मधील संबंधित विभागास मागणी केली. मात्र दोन महिन्यांचा कालावधी झाला. मात्र पुढील हप्ता मिळत नसल्याने पंचायत समिती कार्यालयात येरझाऱ्या सुरू केल्या. मात्र तांत्रिक अडचण दाखवून माझी अवहेलना करण्यात आली असल्याचे मेश्राम यांनी दिलेल्या निवेदनातून सांगितले आहे. दरम्यान राहण्याची सोय नसल्याने घरापुढे पाल टाकून राहत असलेले लाभार्थी हरी गोमा मेश्राम यांनी घराचे बांधकाम त्वरित व्हावे म्हणून दुकानदारांकडून उधार सामान घेतले. मात्र बिल मिळण्यास विलंब झाला असल्याने दुकानदारांनी पैशासाठी हरी मेश्राम यांचेकडे विचारणा केली. त्यामुळे कर्जपायी हताश झालेले हरी गोमा मेश्राम यांनी दोन दिवसात बिल न मिळाल्यास आत्महत्या करण्याचा इशारा दिला असून माझ्या आत्महत्येस गटविकास अधिकारी अक्षय सुक्रे हेच जबाबदार असतील . असे निवेदन दिले आहे. त्यामुळे पंचायत समिती कार्यालयात एकच खळबळ उडाली आहे.