सुरक्षा पोलीस टाइम्सने गडबवाडी बाॅक्साईट विरोधात लावलेल्या बातमीचा प्रभाव-सायगांव ग्रामपंचायतीचेही सहकार्य..!

सुरक्षा पोलीस टाइम्सने गडबवाडी बाॅक्साईट विरोधात लावलेल्या बातमीचा प्रभाव-सायगांव ग्रामपंचायतीचेही सहकार्य..!

✍️सचिन पवार✍️
कोकण ब्युरो चीफ
📞8080092301📞

श्रीवर्धन :-दिनांक ६ एप्रिल २०२५ रोजी गडबवाडीत विनापरवाना चालु असलेल्या बाॅकसाईट मायनिंग प्रकल्पाची बातमी प्रसारीत केली होती. त्यानंतर लागोपाठ स्थानिकांनी या विरोधात आवाज उठवायला सुरूवात केली.श्रीवर्धन तालुक्यातील गडबवाडीत अंदाधुंद चालु असलेल्या बाॅकसाईट खाणकामाला स्थानिक तरुणांनी कडकडून विरोध केला आहे. याबाबतचे निवेदन देखील त्यानी २ एप्रिल २०२५ रोजी संबंधित खात्याला दिले आहेत.तरीदेखील त्याना विश्वासात न घेता विनापरवाना बाॅकसाईट खाणकाम जोरदार चालु आहे. मग श्रीवर्धन मधील वाल्मिक कराड कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे आणि बीड सारखी परिस्थिती सध्या श्रीवर्धन तालुक्यात झाली आहे.

पर्यावरणाचा रहास आणि मानवी तसेच वन्य प्राण्यांवर होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी विनाशकारी बाॅकसाईट मायनिंग बंद करावी म्हणून सायगांव ग्रामपंचायतीची मागणीही आता जोर धरू लागली आहे. याबाबतचे लेखी निवेदन त्यानी मा.मुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस यांना दिले आहेत.आता मुख्यमंत्री यावर काय सकारात्मक निर्णय घेतात याकडे सर्व ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे. तरि देखील मुख्यमंत्री यानी सदर चालु असलेले प्रकल्प बंद करावे अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून केली जात आहे.