दैनिक मीडिया वार्ता न्यूस चे गोरेगांव प्रतिनिधी नी मागितली 100 नंबर वर मदत,! पोलीस पोहचले पाऊण तासांनी.
✍️ पप्पू वि. नायर ✍️
मुंबई शहर प्रतिनिधी
मो :- 7304654862
मुंबई :- गोरेगांव पश्चिम प्रेम नगर मधे राहणारे दैनिक मीडिया वार्ता न्यूस चे प्रतिनिधी पत्रकार श्री. पप्पू नायर यांच्या घरासमोर सध्या इलेक्ट्रिक केबल टाकण्यासाठी आलेल्या रस्त्याच्या खोदकामामुळे त्यांच्या मालकीची दुचाकी पार्किंग च्या समस्या मुळे सदर दुचाकी प्रेम नगर वसाहती मधल्या सार्वजनिक सौचालयच्या येथे पार्क करण्यात आली होती, दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी तेथे गेले असता तेथील दुचाकी काढून रस्त्यावर बेवारस वाहनांसारखी उभी करून त्या जागेवर ऑटो रिक्शा पार्क केल्याचे आढळून आले, याच कारणावरून ऑटो रिक्शा वाल्याचा स्वत तपास करून त्याच्या घरी जाऊन त्याला जाब विचारला असता, त्याच्या कडून उडवा – उडवीची उत्तर व अरेरावी करण्यात आली.
सदर ऑटो रिक्शा वाल्याची फिर्याद नोंदवण्यासाठी घटना स्थळी 100 नंबर डायल करून पोलिसांना पाचारानं करण्यात आले, पण पोलीस घटनास्थळी पाऊण तासांनी पोहचले. नंतर संपूर्ण घटनाक्रम पोलिसांना सांगून पोलिसांनी आरोपीला घेऊन गोरेगांव पोलीस स्टेशन ला आणण्यात आले, नंतर तेथील सहाय्यक पोलीस निरीक्षक बिरू जोग साहेबांना संपूर्ण घटना क्रम सांगितला असता, संबंध प्रकारच्या घटना क्रमानुसार जोग साहेबांनी आरोपीवर कुठलीही कार्यवाही न करता फक्त समज देऊन सोडण्यात आले.
पत्रकार असून पोलीस प्रशासनाची कामगिरी एवढी ढिली असल्याचे पाहायला मिळाले, परंतु मनात एक शंखा येण्याचे कारण म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत असलेल्या पत्रकारांचे जर समस्यांचे अशा पद्धतीने जर पोलीस प्रशासन निवारण करत असतील तर, अशा पोलिसांचा आम्ही सर्व पत्रकार प्रतिनिधिकडून जाहीर निषेध करतो. पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते श्री. पप्पू नायर यांना आज आलेला अनुभव व्यक्त करत, सर्व सामान्य जनतेसोबत हे अशा प्रकारचे पोलीस कसे वागत असतील, असा भयानक अनुभव डोळ्यासमोर दिसत आहे. अशा कामचुकार पोलीस कर्मचाऱ्यांवर महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस व मुंबईचे पोलीस आयुक्त कारवाई करतील का.
सर्वसामान्यांच्या समस्या, सर्व सामान्यांचे प्रश्न
सर्वसामान्यांच्या बातम्यांनाच, आम्ही देतो महत्त्व
आज आपल्या विश्वासाबरोबरच मीडिया वार्ता न्यूजला गरज आहे, आपल्या मदतीची. आपली छोटीशी मदत या फेक न्यूजच्या काळात सर्वसामान्य जनतेच्या बातम्यांना वाचा फोडून प्रामाणिकपणे काम करण्यासाठी लाखमोलाची ठरू शकते.