आतंकवादी हल्ल्याचा अलिबागच्या मुस्लिम धर्मीय यांच्या कडून निषेध

आतंकवादी हल्ल्याचा
अलिबागच्या मुस्लिम धर्मीय यांच्या कडून निषेध

रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:- जम्मू काश्मीर मधील पहेलगमच्या बैसरान घाटीमध्ये 22 एप्रिल रोजी तेथे आलेल्या पर्यटकांवर लष्कर ए तयब्बा या आतंकवादी संघटनेच्या दि रजिस्टन्स फ्रंट नागटाच्या वतीने भ्याड हल्ला करण्यात आला. त्या हल्ल्याचा निषेध अलिबाग मधील मुस्लिम बांधवानी केला आहे.

पहलगमच्या बैसरान घाटी मध्ये पर्यटकांवर भ्याड हल्ल्याच्यावेळी आतंकवाद्यांनी तेथे उपस्थित असलेल्या पर्यटकांना त्यांचे नाव, धर्म, विचारला आणि जे हिंदू पर्यटक होते त्यांना मारून टाकले. या हल्ल्या दरम्यान तेथील आतंकवाद्यांनी कलमा बोलण्यास सांगितले. हे खूप संतापजनक आहे. याचा निषेध करण्यासाठी अलिबाग येथील मुस्लिम बांधव येथील बाजारपेठेतील जामा मशिदी समोर मोठ्या संख्येने जमा झाले. त्यांनी राष्ट्रध्वज हातात घेऊन या घटनेचा निषेध नोंदविला.तसेच मृत पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण केली. याप्रसंगी नसीम बुकबाइंदडर, वसीम साखरकर , अश्रफ घट्टे, मुश्ताक घट्टे, जाफर सय्यद , फरीद सय्यद , भाजप शहर अध्यक्ष ॲड अंकित बंगेरा, पोलिस उपअधीक्षक विनीत चौधरी, पोलिस निरीक्षक किशोर साळे आणि मोठ्या संख्येने मुस्लिम समाज उपस्थित होता.