नितीन गडकरी यांचे वाढदिवसानिमित्त भाजपाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन.

64

नितीन गडकरी यांचे वाढदिवसानिमित्त भाजपाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन.

रक्तदान यज्ञात भाग घेऊन आमदार समीर कुणावार यांनी केले रक्तदान.

नितीन गडकरी यांचे वाढदिवसानिमित्त भाजपाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन.
नितीन गडकरी यांचे वाढदिवसानिमित्त भाजपाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन.

मुकेश चौधरी, विदर्भ ब्युरो चीफ✒
हिंगणघात,दि.27 मे :- भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, कर्तव्यदक्ष व कार्यकुशल केंद्रीय मंत्री, विकासपुरुष व लोकनेते नितिन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त आज दि.27 मे रोजी भारतीय जनता पार्टी तसेच भारतीय जनता युवा मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

आज दिनांक 27 मे रोजी सकाळी 10 वाजता तालुक्यातील वडनेर येथील गजानन महाराज मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आले. विशेष म्हणजे या शिबिरात विधानसभा क्षेत्राचे आमदार समीरभाऊ कुणावार यांनी 56 वेळा रक्तदान करुन युवकांसाठी आदर्श निर्माण करीत रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे.

आमदार समीर कुणावार हे गेल्या 25 वर्षा वर्षापासून रक्तदान करीत आहेत. त्यांनी 56 वेळेस रक्तदान करण्याचा विक्रम नोंदविला आहे. या शिबिरामध्ये सुद्धा त्यांनी स्वयंस्फूर्तपणे रक्तदान केले. याप्रसंगी हिंगणघाट ग्रामीण परिसरातील युवक रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने रक्तदान केले. रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान करुन या रक्तदान यज्ञात वडनेर येथील माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव आंबटकर, तालुका अध्यक्ष आकाश पोहाणे, पं. स. सभापती सौ. शारदाताई आंबटकर, हिंगणघाट न. प. बांधकाम सभापती सौ. छायाताई सातपुते, भाजयुमोचे विठू बेनीवार, विक्की राऊत, भाग्येश देशमुख, तुषार आंबटकर, सौरभ शिवणकर, आकाश बावणे, उमेश कोल्हे, प्रज्वल खैरे, अनिल येळणे, सुनील सरोदे, सुमित ढगे इत्यादीनी सहभाग घेऊन शिबिर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.