दक्षिण ब्रम्हपुरी वनक्षेत्राच्या वनक्षेत्र अधिकारी लक्ष्मी शहा निलंबित; मुख्य वनसंरक्षकांचा आदेश.

53

दक्षिण ब्रम्हपुरी वनक्षेत्राच्या वनक्षेत्र अधिकारी लक्ष्मी शहा निलंबित; मुख्य वनसंरक्षकांचा आदेश.

दक्षिण ब्रम्हपुरी वनक्षेत्राच्या वनक्षेत्र अधिकारी लक्ष्मी शहा निलंबित; मुख्य वनसंरक्षकांचा आदेश.
दक्षिण ब्रम्हपुरी वनक्षेत्राच्या वनक्षेत्र अधिकारी लक्ष्मी शहा निलंबित; मुख्य वनसंरक्षकांचा आदेश.

✒अमोल माकोडे✒
ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी

ब्रह्मपुरी :- सविस्तर वृत्त असे आहे की, ब्रह्मपुरी वनविभागाअंतर्गत येणाऱ्या दक्षिण ब्रह्मपुरी वनक्षेत्राच्या वनपरिक्षेत्र अधिकारी लक्ष्मी शहा यांना सोमवारी मुख्य वनसंरक्षकांच्या आदेशान्वये निलंबित करण्यात आले आहे. शासकीय कामात अनुभव नसून कर्मचाऱ्यांशी उद्धटपणे वागण्याचा ठपका शहा यांच्यावर ठेवण्यात आला असून, या कारवाईमुळे वनविभागात चांगलीच खळबळ माजली आहे.

अमरावती जिल्ह्यातील मेळघाटच्या वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणानंतर वनविभाग अलर्ट झाला आहे. वरिष्ठ वनाधिकारी कर्मचाऱ्यांच्या तक्रारींची दखल घ्यायला लागले असून, दक्षिण ब्रह्मपुरी वनक्षेत्राच्या आरएफओ लक्ष्मी शहा यांच्याकडूनही कर्मचाऱ्यांना उद्धट वागणूक देऊन दमदाटी केली जात होती. मानसिक त्रास देण्याचे प्रकारही सुरू होते. शासकीय कामामध्ये लागणारे साहित्य खरेदी न करता काम करण्यासाठी त्रास देणे, पाळीव प्राण्यांच्या नुकसान प्रकरणामध्ये धमकी देऊन बनावट केस करण्यासाठी त्रास देणे, कर्मचाऱ्यांचे सीआर खराब करण्याची धमकी देणे, गावातील प्रतिष्ठीत नागरिकांशी संपर्क न ठेवता कोणतीही सभा आयोजित न केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. दरम्यान, १५ मे रोजी एकारा येथील विश्रामगृहावर वरिष्ठ वनाधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांनी त्यांच्याबाबत तक्रारी केल्या होत्या.

दक्षिण ब्रह्मपुरी वनक्षेत्रात मागील तीन वर्षात एकूण सहा जणांचा मृत्यू तर १७ जण वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जखमी झाले आहे. वन वणव्याच्या घटनाही मोठ्या प्रमाणता घडल्या असून, वनसंपदेचे नुकसान झाले आहे. त्यामुळे वनपरिक्षेत्र अधिकारी लक्ष्मी शहा आपल्या शासकीय कामामध्ये तत्पर राहात नसल्याचा ठपकाही त्यांच्यावर ठेवण्यात आला असून, महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ च्या नियम ४ च्या पोटनियम (एक) अन्वये मुख्य वनसंरक्षकांना प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून सोमवारी आरएफओ लक्ष्मी शहा यांना निलंबित केले आहे. निलंबन कालावधीत शहा यांना मध्यचांदा वनविभागाचे उपवनसंक्षक यांच्या पूर्व परवानगी शिवाय मुख्यालय सोडता येणार नाही, असेही आदेशात नमूद आहे