पुलगाव पोलिसांनी छापा टाकून तब्बल 15 जुगाऱ्यांना ताब्यात घेतले.

आशीष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
वर्धा/पुलगाव:- कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. परंतु, याच संचारबंदीच्या काळात जिल्हा प्रशासनाच्या नियमांना बगल देत जुगार सुरू असल्याची माहिती मिळताच पुलगाव पोलिसांनी चिंतामणी कॉलोनीतील एका घरी छापा टाकून तब्बल 15 जुगाऱ्यांना ताब्यात घेतले. या जुगाऱ्यांकडून पोलिसांनी रोखसह 16 हजार 640 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

चिंतामणी कॉलोनीतील रहिवासी अमोल काळे हा कॅटर्स व्यावसायिक असून त्याच्या घरात अवैधरित्या जुगार भरविल्या जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळता पोलिसांनी आपल्या हालचालिंना गती देत अमोल काळे यांच्या घरी छापा टाकला. त्यावेळी बाबाराव रामदास बलवीर, आकाश रामराव फुंडे, सचिन रमेश वरवाडे, अभिजित योगेंद्र दुबे, विशाल बबन इरपाचे, शेखर शिवलाल साखरगडे, अजय हरिश्चंद्र जाधव, प्रमोद जनार्दन आमले, चेतन रतनलाल साहू, विनोद सत्यनारायण दुबे, ओमशंकर बलकरण पांडे, तोषिफ खान बब्बूखान पठाण, हितेंद्र यादवराव सावंत, अहमद रजा खान, जिमल खान महमूद खान हे जुगार खेळताना रंगेहात पोलिसांच्या हाती लागले. या जुगाऱ्यांकडून पोलिसांनी रोख 16 हजार 490 रुपये तसेच इतर साहित्य  असा एकूण 16 हजार 640 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या पंधराही जुगाऱ्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here