श्री सिद्धेश्वर महाराज देवस्थानाचा लवकरच होणार कायापालट.

66

श्री सिद्धेश्वर महाराज देवस्थानाचा लवकरच होणार कायापालट.

राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रयत्नांना अखेर यश; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची दोन कोटींच्या निधीला विशेष बाब म्हणून मंजुरीसाठी परवानगी

श्री सिद्धेश्वर महाराज देवस्थानाचा लवकरच होणार कायापालट.
श्री सिद्धेश्वर महाराज देवस्थानाचा लवकरच होणार कायापालट.

🖋️मनोज खोब्रागडे🖋️
पूर्व विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
मुंबई, (प्रतिनिधी, ता. 27) :- औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील अवघ्या मराठवाड्याचे आराध्य दैवत असलेल्या श्री क्षेत्र सिद्धेश्वर महाराज देवस्थान आणि परिसराचा विकास होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या देवस्थानाचा कायापालट व्हावा म्हणून महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार अनेक अनेक दिवसांपासून प्रयत्न करीत होते. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित दादा पवार यांनी देवस्थानाच्या विकासासाठी दोन कोटींच्या निधीला विशेष बाब म्हणून मंजुरी देण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे राज्यमंत्री सत्तारांच्या प्रयत्नांना अखेर फळ मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

मराठवाड्याचे श्रद्धास्थान असलेल्या सिल्लोड तालुक्यातील श्री सिद्धेश्वर महाराज देवस्थानाचा विकास करण्याचा शब्द राज्यमंत्री सत्तार यांनी दिला होता. त्याप्रमाणे गेल्या अधिवेशनात या देवस्थानाचा ‘ ब ‘ वर्गाच्या तीर्थक्षेत्रात समावेश करून घेतला. त्यानंतर या तीर्थक्षेत्राला क्षेत्राचा विकास व्हावा यासाठी निधी मिळवण्यासाठी सातत्याने राज्यमंत्री सत्तार पाठपुरावा करीत होते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दोन कोटींच्या निधीला निधीच्या मंजुरीला परवानगी दिल्यानंतर त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे त्यामुळे त्यांनी जनतेला दिलेला शब्द पाळल्याच्या भावना सर्वसामान्यांमधून व्यक्त होत आहेत.

श्री सिद्धेश्वर महाराज देवस्थानात औरंगाबाद जिल्ह्यातून नव्हे तर संपूर्ण मराठवाड्यातून भाविक येतात. त्या प्रमाणात या ठिकाणी सुख-सुविधा नाहीत. मात्र आता या देवस्थानाचा कायापालट होणार आहे. या ठिकाणी भाविकांसाठी सर्व सुविधांनी युक्त असे भक्त निवास, नवसपूर्तीसाठी किचन शेड, पूजेसाठी शेड, रस्त्यांचा विकास, विद्युत रोशनाई, स्वच्छतागृह आणि परिसरात बगीच्या आदी मूलभूत सुविधा या ठिकाणी मिळणार आहेत.

मराठवाड्याचे आराध्य दैवत असलेल्या श्री सिद्धेश्वर महाराज देवस्थानाचा विकास व्हावा हे माझे अनेक दिवसापासून चे स्वप्न होते. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी निधी मंजुरीला परवानगी दिल्यानंतर हे स्वप्न पूर्णत्वास येणार असल्याने मी अतिशय समाधानी आहे.अब्दुल सत्तार, महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री यांनी म्हटले आहे.