पोलीस स्टेशन आंधळगाव तर्फे दोन दिवसीय इनडोअर मार्गदर्शन शिबिर संपन्न

पोलीस स्टेशन आंधळगाव तर्फे दोन दिवसीय इनडोअर मार्गदर्शन शिबिर संपन्न

पोलीस स्टेशन आंधळगाव तर्फे दोन दिवसीय इनडोअर मार्गदर्शन शिबिर संपन्न

✍ मिथुन लिल्हारे ✍
मोहाडी तालुका प्रतिनिधी
📱8806764515 📱

मोहाडी :- भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यात येणारे मौजा आंधळगाव येथे, दिनांक २५ मे व २६ में २०२२ रोज बुधवार व गुरुवार ला सायंकाळी ४:३० ते ७:३० वाजेपर्यंत दोन दिवसीय इनडोअर मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले. या शिबिराचे आयोजन, पोलीस स्टेशन आंधळगाव तर्फे आयोजीत करण्यात आले होते. इनडोअर मार्गदर्शन शिबिराचे स्थळ पोवराई सभागृह आंधळगाव हे होते.
या इनडोअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजक स.पो.नि. मा. सुरेश मट्टामी ठाणेदार व पोलीस अमलदार, पोलीस स्टेशन आंधळगाव हे होते. या शिबिरामध्ये जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन देखील केला होता.
*या इनडोअर मार्गदर्शन शिबिराचे विषय **
स्पर्धा परिक्षा तयारी, रोजगार मार्गदर्शन, व्यक्तीमत्व विकास, जिवन कौशल्य, पोलीस / सैनिक भरती पूर्व प्रशिक्षण व एमपीएससी मार्गदर्शन या विषयावर तज्ञ व्यक्तींकडून मार्गदर्शन करण्यात आले. मार्गदर्शक मा. निशांत मेश्राम पोलीस निरिक्षक वरठी, मा. दिपक पाटील ठानेदार पोलीस स्टेशन गोबरवाही, यांनी मार्गदर्शन केले. या मार्गदर्शन शिबिराला पोष्ट आंधळगाव हद्दीतील एकून ८५ तरुण मुले, मुली उपस्थित राहून, मार्गदर्शनाचा लाभ घेतला.
या मार्गदर्शन शिबिराचे आयोजक स.पो.नि. मा. सुरेश मट्टामी ठानेदार व पोलीस अमलदार, पोलीस स्टेशन आंधळगाव हे होते.व संपूर्ण पोलीस सिपाई स्टॉप यांनी 7350968100 या भ्रमन ध्वनीवर फोन करून आपली नावे दर्ज करून घ्यावे अशी विनंती केली होती.