दर्जा मातानं माय माझी, पण मंदिरात जाण्यासाठी रस्ताच नाही.

दर्जा मातानं माय माझी, पण मंदिरात जाण्यासाठी रस्ताच नाही.

दर्जा मातानं माय माझी, पण मंदिरात जाण्यासाठी रस्ताच नाही.

✍ मिथुन लिल्हारे ✍
मोहाडी तालुका प्रतिनिधी
📱 8806764515 📱

मोहाडी :- भंडारा जिल्हयातील मोहाडी तालुक्यात येणाऱ्या ग्राम मांडेसर येथे पुरातन काळातील माता माय यांचे मंदिर स्थित आहे. पण मंदिरात जाण्याचा साधा रस्ता नसल्याने मंदिरात जाताना भाविकांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो.ग्राम मांडेसर येथील परसराम गोधळ दमाहे यांच्या शेतात पुरातन काळातील मातामाय व खामदेव यांचे दोन मंदिर स्थित आहेत.माता माय व खामदेव हे दोन्ही मंदिर १०० फुट अंतरावर आहे. परंतु या मंदिरात जाण्याकरिता साधा रस्ता तयार करण्यात आला नसल्याने भाविकांना जाण्यास कमालीचा त्रास सहन करावा लागतो आहे.
पण ग्राम पंचायत कार्यालय मांडेसर येथील पदाधिकारी कानाडोळा करीत आहे. कारण यांना राजकारण करायचं आहे. जर या माता माय व खामदेव मंदिरासाठी रस्त्याचे मुद्दे समितीपुढे ठेवले तर आमचा मतदान कमी होईल अशी समजूत ग्राम. पंचायत मांडेसर येथील पदाधिकारी यांना वाटत आहे. आणि आपण मंदिरात जाण्यासाठी रस्ता जर काढले तर आमचेच कार्यकर्ता, आमचेच माणसे आपल्या विरोधात जाईल, व पुढे ग्रामपंचायतीला आमचे शासन बसणार नाही. म्हणून ग्रामपंचायत कार्यालय मांडेसर हे चुप्पी लाऊन बसलेली आहे.
भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यात असणारे मौजा मांडेसर हे गाव प्रख्यात गाव म्हणून ओळखले जाते. या गावात राजनिती मध्ये तज्ञ लोक आहेत. चुनाव असला की कसें आपणास वोट काढता येईल याची शाम , दाम, दंड, भेद, या गनिमीकावा पद्धतीने ओट मागण्याची क्षमता यांच्यामध्ये आहे. परंतू आपल्याच
समाजामध्ये आपले कुलदैवत म्हणून मानणारे माता नं माय माझी यांच्या मंदिरात जाण्यासाठी साधा रस्ता नाही? हा कितपत योग्य आहे. आणि ग्राम पंचायत कार्यालय मांडेसर हि का निर्णय घेत नाही ? यांच्याकडे संपूर्ण मांडेसर वासीयांचे लक्ष केंद्रित झाले आहे.
आपल्या देशात सर्व धर्म समभाव, व लोकशाही शासन आहे. आणि लोकांनी लोकांकरीता निवडून दिलेले शासन म्हणजेच लोकशाही शासन. मग लोकप्रतीनीधी म्हणून निवडून दिलेले प्रतिनिधी यांची जिम्मेदारी काय ? हेच त्यांना कळत नाही. तर असे प्रतिनिधी कोणत्या कामाचे असे प्रश्न मौजा मांडेसर येथील जनतेत निर्माण झाले आहे.
पुरातन काळापासून स्थित असलेले माता माय मंदिर व खामदेव मंदिर, यांची पुजापाठ शेतीच्या हंगामापूर्वी गावजत्रा या माध्यमातून, हनुमान मंदिर यांची हिंदु रितीरिवाजाप्रमाणे पिढ्यानं पिढ्या चालत असलेली परंपरा या मांडेसर गावात सुरु आहे. लग्ण, मन्नत, अशा विविध मन्नत या मंदिरात करत असुन या मंदिरात जाण्याचा रस्ता का नाही ? अशा प्रश्न गावकऱ्यांचा मुखातून बाहेर पडले आहे. आणि आतापर्यंत ग्राम पंचायत समिती मांडेसर यांनी कोणतीच प्रोसिडिंग तयार केलेली नाही. हे किती दुःखाची बाब आहे. ही, ग्रामपंचायत का झोपीत कारभार चालवित आहे. असा मोठा प्रश्न गावकऱ्यांसमोर पडला आहे.
ग्राम पंचायत समिती मांडेसर यांनी घेतलेल्या वार्षिक सभेमध्ये हा प्रस्ताव टाकण्यात आलेला आहे. माता माय मंदिरात जाण्याचा वहिवाटी रस्ता बनला पाहीजे असे गावकऱ्यांनी एकत्र येऊन हा मुद्दा ग्राम सभेच्या वार्षीक सभेमध्ये टाकले आहे.
आता फक्त एकच वाट आहे. की, माता न माय माझी या मंदिरात जाण्याचा वहिवाटी रस्ता केव्हा काढणार, याकडे मांडेसर वासी यांचे लक्ष वेधले आहे.
समाजामध्ये विविध जाती धर्माचे लोक आहे. पण आपले कुलदैवत मंदिर हा आजही अंधारात का आहे ? या मंदिरात जाण्याचा पर्यायी रस्ता कोणता ? आणि पांधन रस्ता कुठूनं काढणार ? आणि ते केव्हा होणार ? याकडे लोकांचे कल वाढतांनी दिसत आहे. म्हणून गावकर्यांनी माता माय मंदिरात जाण्यासाठी गावकऱ्यांना रस्ता हवी आहे. अशा प्रस्ताव वार्षिक ग्रामसभेत ग्रामस्थांनी टाकला आहे. ती रस्त्याचे काम केव्हा सुरु होणार, यांकडे गावकऱ्यांचे लक्ष केंद्रित झाले आहे.