दुर्पता सौद या विद्यार्थिनीने राष्ट्रीय बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये पटकावले कांस्यपदक

दुर्पता सौद या विद्यार्थिनीने राष्ट्रीय बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये पटकावले कांस्यपदक

दुर्पता सौद या विद्यार्थिनीने राष्ट्रीय बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये पटकावले कांस्यपदक
संतोष आमले
पनवेल तालुका / प्रतिनिधी
9220403509

पनवेल : – पुणे येथील महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये 36-38 वजनी गटात सुवर्णपदक जिंकणाऱ्या पनवेलच्या दगडी शाळेतील दुर्पता सौद या विद्यार्थिनीने इंस्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स, जेएसडब्लू , बेल्लारी कर्नाटक येथे झालेल्या सब ज्युनियर बीएफआय राष्ट्रीय बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक पटकावले आहे.
दुरपताने 36 – 38 किलोग्रॅममध्ये राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले होते. तिच्या प्राथमिक फेरीत दिल्ली, केरळ आणि कर्नाटकच्या बॉक्सर्सला हरवून उपांत्य फेरी गाठली होती.उपांत्य फेरीत तिचा सामना हरियाणाच्या सानिकाशी झाला होता. दोन्ही बलाढ्य बॉक्सर्सनी आपली सर्वोत्तम कामगिरी आणि झुंज दिली.गुणांवर सानिका जिंकली आणि दुरपताला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.