ब्रह्मपुरीत विक्रमी तापमानाची नोंद, 🌡️पारा 47.1 सेल्सिअसवर ☀️
• पुढील सात दिवस विदर्भवासियांसाठी कठीण 🔥
🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351
चंद्रपूर/ ब्रम्हपुरी : 27 मे
सूर्यानं 25 मे पासून रोहिणी नक्षत्रात प्रवेश केला असून विदर्भात नव तपाला सुरुवात झाली आहे. नव तपाच्या पहिल्याच दोन दिवसात विदर्भात विक्रमी तापमानाची नोंद झाली असून चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यात आज सोमवारी, 27 मे रोजी पारा 47.1 अंश इतका पारा वाढला. त्यापाठोपाठ नागपूर 45.6, चंद्रपूर 44.8, भंडारा 45.5, अमरावती 45.0, वर्धा 45.0 अंश इतक्या तापमानाची नोंद झाली. त्यामुळे नव तपाचे पुढील सात दिवस विदर्भवासियांसाठी आणखी कठीण जाणार आहेत. हवामान विभागानेही 29 मे पर्यंत विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा दिला आहे. त्यामुळे वैदर्भीय जनतेने उष्माघातापासून बचाव करण्याची विशेष काळजी घेण्याचे आवाहन प्रशासन आणि हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.
• पुढील सात दिवस विदर्भवासियांसाठी कठीण
विदर्भात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने विश्रांती घेतल्यानंतर काल दुपार नंतर पुन्हा अवकाळी पावसानेही दमदार हजेरी लावली आहे. दुपारपर्यंत अंगाची लाहीलाही करणाऱ्या उष्णतेच्या लाटेने हैराण झालेल्या नागरिकांना चंद्रपूर शहर तसेच जिल्ह्यात तालुक्यांच्या काही ठिकाणीं दुपारनंतर मात्र सोसाट्याचा वारा आणि ढगाळ वातावरणाने उष्णतेपासून काही काळ का असेना पण उसंत दिली.