माणगांव पोलिसाचे नागरिकांना आवाहन फसवणूक करणाऱ्यापासून सावधान माणगांव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करा....

माणगांव पोलिसाचे नागरिकांना आवाहन फसवणूक करणाऱ्यापासून सावधान माणगांव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करा….

माणगांव पोलिसाचे नागरिकांना आवाहन फसवणूक करणाऱ्यापासून सावधान माणगांव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करा....

✍️सचिन पवार ✍️
कोकण ब्युरो चीफ
📞8080092301📞

माणगांव :- सदर बातमीद्वारे आवाहन करण्यात येत आहे की माणगांव पोलीस ठाणे येथे आरोपी इसम क्र.1) संदेश सुरेश कवडे रा. वंदना अपार्टमेंट कचेरी रोड माणगांव रायगड इसम क्र.2) मनोज सदानंद तेटगुरे रा. साळवे ता माणगांव रायगड इसम क्र.3) देवेंद्र पांडुरंग गायकवाड रा. निजामपूर ता. माणगांव जि. रायगड व इसम क्र.4 संजय बाळकृष्ण गायकवाड रा.अपना मेडिकल च्या वरती तिसरा मजला कचेरी रोड ता माणगांव जि रायगड यांच्यावर फौंजदारी गुन्हा क्रमांक 115/2024 आयपीसी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कलम 420,34 cont 24/04/2024 रोजी गुन्हा दाखल झालेला आहे. दाखल गुन्ह्याच्या आता पर्यतच्या झालेल्या तपासामध्ये गुन्ह्यातील वर नमूद आरोपीनी चौघा जणांच्या भागीदारीत “आपला अँडव्हायझरी “व ट्रस्ट इंटरप्रायझेस नावानी कंपनी स्थापण करून बिझनेस ऑफिस सुरु केले असल्याचे लोकांना सांगून त्यामध्ये पैसे गुतवणूक करण्यास सांगितले त्या बिझनेसमध्ये व्यावसायिक पैसे लोकांनी केलेल्या रक्कमेची नफ्यातून 6 टक्के ते 7 टक्के रक्कम प्रत्येक महिन्याला देऊ असे सांगितले व लोकांना विश्वास संपादन केला. त्यानंतर आरोपीच्याकडे त्याच्या सांगण्यावरून गुतवणूक करणाऱ्या लोकांना परत देण्यास टाळाटाळ करून आरोपीनी अनेक गुतवणूकदाराची फसवणूक केली असल्याचे निषन्न होत आहे.तरी वर नमूद आरोपीकडून अशा प्रकारे फसवणूक झालेल्या लोकांनी माणगांव पोलीस ठाणे येथे येऊन तक्रार दाखल करावी असे आवाहन करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here