चक्री वादळामुळे नुकसान झालेल्या लोकांना पावसाळ्यापूर्वीच भरपाई मिळावी – समाजसेवक नितेश पूरारकर.
✍️नंदकुमार चांदोरकर ✍️
माणगाव तालुका प्रतिनिधी
📞८९८३२४८०४८📞
माणगांव – १६ मे २०२४ रोजी चक्री वादळामुळे नुकसान झालेल्या लोकांना पावसाळ्यापूर्वीच नुकसान भरपाई मिळावी असे पूरार येथील समाजसेवक नितेशजी पुरारकर यांनी ही मागणी प्रशासनाकडे केली आहे.
चक्री वादळ आणि पावसाची आठवण रायगड जिल्ह्यातील माणगांव, महाड, तालुक्यात पाहायला मिळाली .पुनरावृत्ती १६ मे ला पाहायला मिळाली. चक्रीवादळ मुळे महाड तालुक्यामध्ये अनेक गावे तर माणगांव तालुक्यातील पुरार नांदवी वणी तसेच मलाई या गावी मोठ्या प्रमाणात पुन्हा चक्रीवादळाने थैमान घातले. असंख्य लोकांचे मोठे नुकसान झाले आहे. घरावरचे पत्रे कौल उडून गेल्याने घरांची दुरवस्था झालेली पाहायला मिळाली.व काही लोकांना किरकोळ दुखापत सुध्दा झाली आहे. तसेच शेळ्यांचा गोठा जमिनदोस्त झाला असून शेळ्यांना देखील दुखापत झालेली पाहायला मिळाली.
दि. १६ मे २०२४ रोजी तेज मराठी न्यूज, ठाम मत न्यूज तसेच झी टीव्ही न्यूज चैनल ने बातमी प्रसारित केल्यानंतर दुसऱ्या दिवशी स्थानिक प्रशासन अर्थात ग्रामपंचायत पुरार सरपंच, उपसरपंच, तलाठी व ग्रामसेविका यांनी पंचनामे करून प्रशासनाला सुपूर्त केले असावेत असा अंदाज आहे. तरी माझी प्रशासनाला व महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांना विनंती पूर्वक मागणी आहे. सर्वच लोकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे तरी पावसाळा सुरू होण्यापूर्वीच लोकांना नुकसान भरपाई देण्यात यावी.तसेच स्थानिक लोकप्रिय आमदार गोरगरिबांचे कैवारी मा.आमदार भरत शेठ गोगावले साहेब यांनी देखील रायगड मधील माणगांव तसेच महाड तालुक्यातील नुकसान झालेल्या लोकांना शासनामार्फत भरपाई मिळण्याकरिता लक्ष द्यावे.व स्वतः देखील मदतीचा हात नेहमी प्रमाणे पुढे करावा ही विनंती.