पहिल्याच पावसात मुंबईची झाली तुंबई! मुंबईला पावसाने झोडपले.

पहिल्याच पावसात मुंबईची झाली तुंबई! मुंबईला पावसाने झोडपले.

✍️ पप्पू वि. नायर ✍️
मुंबई शहर प्रतिनिधी
मो :- 7304654862

मुंबई :- रात्रीपासून मुंबई मधे पावसाच्या हलक्या सरी सुरु होऊन सकाळी संपूर्ण मुंबईत पावसाने पूर्ण अंधार होऊन पावसाने अक्षर्षा मुंबईकरांना झोडपून काढले. मालाड, मालवणी, गोरेगांव, जोगेश्वरी, अंधेरी, विले पार्ले, बांद्रा, खार, सांताक्रूझ भागात पावसाची दमदार बॅटिंग पाहायला मिळाली.

तर काही भागात रस्ते जलमय झालेले पाहायला मिळाले, त्यातूनच वाट काढत वाहनांना कसरत करावी लागत होती, त्यात मुंबईची लाईफ लाईन समजली जाणारी लोकल ट्रेन अगदी धिम्या गतीने चालू होती, त्यामुळे कामावर जाणाऱ्या नागरिकांचे जास्त प्रमाणात हाल झालेले दिसलें, मुंबईची वाहतूक संत गतीने चालू होती.

मे महिन्यातच मान्सून पूर्व पावसाची सुरुवात झाल्याने अख्या महाराष्ट्रात पावसाने थैमान घातल्याचे चित्र पाहायला मिळते, याचा आर्थिक फटका शेतकरी वर्गाला मिळाला असून, शेतकरी बांधव चिंतेत आल्याचे समजते, तर कुठे – कुठे पूर स्थिती होऊन गावांचा संपर्क तुटल्याची माहिती समोर येते.

महत्वाचं म्हणजे आज 16 दिवसापूर्वी उदघाटन झालेल्या भुयारी मेट्रो ची दयनीय अवस्था पाहायला मिळाली, एवढे पैसे खर्च करून बनवलेली भुयारी मेट्रो स्थानकांची अवस्था पाहता फार बिकट झाली आहे. विशेष म्हणजे तांत्रिक अडचणींचा कारण सांगून भुयारी मेट्रो चे शटर बंद करण्यात आले व प्रसार माध्यमाना तिथे जाण्यास मज्जाव करण्यात आला, पहिल्याच पावसात ही अवस्था तर पुढील चार महिने अजून बाकी आहेत, आजचे चित्र पाहता राज्य सरकार व मुंबई पालिकेचे नियोजन परत एकदा चर्चेचे विषय ठरू शकतात, यात दुमत असल्याचे कारण नाही.