मुंबईत मुन्नाभाई एमबीबीएस बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट.

✒नीलम खरात, मुंबई प्रतिनिधी✒
मुंबई,दि.27 जुन:- आता पर्यंत ग्रामीण भागात बोगस डॉक्टर मिळाल्याचा अनेक घटना समोर आल्या आहे. अशा बोगस डॉक्टरान मुळे अनेक रुग्णाचे जीव धोक्यात आल्याचा पण घटना समोर आल्या. पण, माया नगरी मुंबईतून अशीच एक खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. त्यामुळे सर्वीकडे संताप व्यक्त करण्यात येत आहे.
कोरोनासारख्या महामारीच्या काळातही मुंबई आणि महानगर परिसरात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. दादरमधील एका बोगस डॉक्टराने तब्बल 1 हजारांहून अधिक शस्त्रक्रिया केल्याचे समोर आले आहे. एका टॅक्सीवाल्यावर केलेली शस्त्रक्रिया अयशस्वी ठरल्यानंतर त्याचा प्रताप उघडकीस आला. परंतु, हा केवळ एक नमुना असून मुंबईत अशा मुन्नाभाई एमबीबीएसचा व्यवसाय जोरात सुरू असल्याची माहिती एका ज्येष्ठ आरोग्य तज्ज्ञांनी दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार मुंबईतील लहानमोठ्या विभागांत तपासणी केल्यास प्रत्येक ठिकाणी किमान दोन-तीन बोगस डॉक्टर निघतील. कोरोनाकाळात रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या जवळपास 30 मुन्नाभाईंना पोलीस आणि आरोग्य विभागाच्या पथकाने बेड्या ठोकल्याची माहितीही त्यांनी दिली.