कळमेश्वर येथे भाजपचा चक्काजाम ओबीसी आरक्षण रद्द करण्यात आल्याने, ते पुर्ववत देण्यात यावे: भाजपची मागणी.

✒युवराज मेश्राम, नागपुर जिल्हा प्रतिनिधी✒
नागपूर/कळमेश्वर,दि.27 जून:- कळमेश्वर येथील ब्राह्मणे फाटा तहसील कार्यालयासमोर भारतीय जनता पार्टीच्या वतीने महा विकास आघाडी शासनाच्या दिरंगाई पणामुळे ओबीसी आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले असून आरक्षणाचे दूरगामी परिणाम सर्व जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणावर परिणाम होणार आहे. ओबीसी समाजाला राजकीय हक्क मिळवून देण्यासाठी यापुढे तीव्र आंदोलन करू असा इशारा भाजपाचे ज्येष्ठ नेते डॉक्टर राजीव पोतदार यांनी दिला.
कळमेश्वर तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या वतीने दुपारी दोन वाजता कळमेश्वर बामणी फाटा येथे रद्द झालेल्या ओबीसी आरक्षणाच्या निषेधार्थ चक्काजाम आंदोलन करण्यात आले डॉक्टर राजीव पोद्दार यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनांमध्ये तालुक्यातील व जिल्ह्यातील भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात निदर्शने नारे ठिया मांडण्यात आला. काही काळ दोन्ही बाजूला वाहतूक ठप्प झाली होती. त्यानंतर पोलिसांनी सुरळीत केली. आंदोलनामध्ये ओबीसी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रकाश टेकाडे दिलीप रमेश मानकर, ईमेशवर यावलकर, धनराज देवके, संजय टेकाडे, सोनबा मुसळे, तायवाडे, स्मृति इखार, प्रकाश वरुडकर, महादेव विखार, प्रमोद हत्ती, मनोज मांडवगडे, रमेश राजपुरे, गंगाधर नागपुरे, मनोहर काळे, मनोज शेंडे, सचिन गुल्हाने, दिलीप तायडे, सुनील चुनारकर, वैभव तिकडे, शंकर राऊत आदी भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.