हिंगणघाट येथे छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहवर्धक वातावरण साजरी.

✒आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी✒
हिंगणघाट:- हिंगणघाट येथील वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. उमेश वावरे यांच्या कार्यालयात राजर्षी शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे साध्यापणाने राजर्षी शाहू महाराज जयंती साजरी करण्यात आली. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. उमेश वावरे यांच्या हस्ते शाहू महाराज यांच्या प्रतिमेची पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. डॉ उमेश वावरे यांनी राजश्री शाहू महाराज यांच्या जीवनकार्यावर विचार व्यक्त केले. राजश्री शाहू महाराजाने सर्व ओबीसी, एससी, एसटी आणि सर्व माघास समाजासाठी जे कार्य केल ते आज आपल्या जीवनात सर्वानी उतरावयाला पाहिजे. राजश्री शाहू महाराजाचे विचार आज खुप गरजेचे आहे. ते सर्वानी अंगीकारायला पाहिजे त्याविचारा मुळे महाराष्ट्र आणि भारत देश सूजलाम आणि सुफलाम होईल.
या प्रसंगी कार्यकर्ते मनिष कांबळे, दिलीप कहुरके, महेंद्र त्रीपल्लीवार, संजय गायकवाड यावेळी उपस्थित होते.