नागपुर वाढदिवसाला बोलवुन केला विश्वासघात; तरुणीवर कारमध्येच केला बलात्कार.

52

नागपुर वाढदिवसाला बोलवुन केला विश्वासघात; तरुणीवर कारमध्येच केला बलात्कार.

नागपुर वाढदिवसाला बोलवुन केला विश्वासघात; तरुणीवर कारमध्येच केला बलात्कार.
नागपुर वाढदिवसाला बोलवुन केला विश्वासघात; तरुणीवर कारमध्येच केला बलात्कार.

✒युवराज मेश्राम, नागपुर जिल्हा प्रतिनिधी✒
नागपूर,दि.27 जून:- उपराजधानी नागपूर मधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. एका तरुणीवर झालेल्या बलात्काराच्या एका घटनेनं संपुर्ण नागपुर हादरले आहे. आपला वाढदिवस आहे अस सांगत एका तरुणीला पार्टीला बोलावून एका तरुणानं आपल्या मैत्रिणीवर कारमध्येच बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. तरुणीनं आरोपीचा विरोध केला असता, आरोपीनं तिला बेदम मारहाणही केली आहे. 23 जून रोजी रात्री घडलेल्या या घटनेनंतर पीडितेनं शुक्रवारी नागपुर शहरातील सक्करदरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

29 वर्षीय पीडित तरुणीनं काही दिवसांपूर्वी ऑनलाइन पोर्टलवर नोकरीसाठी अर्ज केला होता. दरम्यान मार्च 2021 मध्ये 28 वर्षीय आरोपी वीरसिंगने तिच्याशी संपर्क साधला. यातून दोघांची ओळख झाली. यानंतर त्यांची मैत्री वाढत गेली. मागील तीन महिन्यांपासून दोघांत सोशल मीडिया आणि वॉट्सअॅपच्या माध्यमातून अनेकदा बोलणं झालं. दरम्यान 23 जून रोजी आरोपी वीरसिंगनं आपला वाढदिवस असल्याची माहिती तरुणीला दिली.

तसेच वाढदिवसाच्या पार्टीसाठी निमंत्रित केलं. 23 जूनच्या रात्री आरोपी वीरसिंग पीडितेला जेवणासाठी बाहेर घेऊन गेला. तो तिला अमरावती मार्गावर असणाऱ्या एका हॉटेलमध्ये जेवणासाठी घेऊन गेला. जेवण झाल्यानंतर, रात्री आठच्या सुमारास आरोपी पीडितेला घेऊन परत येत होता. दरम्यान त्यानं कार रस्त्याच्या कडेला थांबवली. तोपर्यंत आपल्यासोबत काय होणार याची कल्पनाही तरुणीनं केली नव्हती.

आरोपीनं कार रस्त्याच्या कडेला थांबवून पीडितेशी जबरदस्ती करायला सुरुवात केली. आपल्यासोबत काय होतंय हे लक्षात येताचं. पीडितेनं आरोपीचा विरोध केला. पीडितेनं विरोध केल्यानं आरोपीनं तिला कारमध्येच मारहाण करायला सुरुवात केली. आरोपीनं तिला बेदम मारहाण करून जबरदस्तीनं तिच्यावर बलात्कार केला. घटनेच्या दोन दिवसानंतर पीडितेनं शुक्रवारी सक्करदरा पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा दाखल केला. याप्रकरणाचा तपास सुरू आहे.