महाराष्ट्राची विक्रमी कामगिरी; एका दिवसात सात लाख लोकांचे लसीकरण.

55

महाराष्ट्राची विक्रमी कामगिरी; एका दिवसात सात लाख लोकांचे लसीकरण.

महाराष्ट्राची विक्रमी कामगिरी; एका दिवसात सात लाख लोकांचे लसीकरण.
महाराष्ट्राची विक्रमी कामगिरी; एका दिवसात सात लाख लोकांचे लसीकरण.

✒️मनोज कांबळे, मुंबई प्रतिनिधी✒️
मुंबई,दि.27 जुन :- कोरोना वायरसने देशात आणि महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणावर हाहाकार माजवला होता. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोना लसीकरणावर भर देण्यात आला होता. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेला थोडा दिलासा मिळाला. माघील काही दिवसापासून करोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत महाराष्ट्र दररोज उच्चांकी कामगिरी नोंदवत आहे. काल देखील त्यात अजून एका विक्रमाची भर पडली असून सायंकाळी सात वाजेपर्यंत 7 लाख 26 हजार 588 नागरिकांना लस देण्यात आली. एकाच दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणावर लस देण्याची आतापर्यंतची ही सर्वोच्च आकडेवारी आहे. राज्यात आतापर्यंत 3 कोटी 9 लाख 79 हजार 460 लोकाना कोरोना वायरस लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत.

देशात लसीकरणात महाराष्ट्र अग्रस्थानी आहे. हे सातत्य दररोज टिकवत महाराष्ट्र देशात सर्वत जास्त लसीकरण करत आहे. ही लक्षणीय कामगिरी करणाऱ्या आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कौतुक केले आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात लसीकरण मोहिमेला वेग आला असून त्यामुळे लक्षणीय कामगिरीची नोंद होत आहे. दर दिवशी आधीच्या दिवसाच्या विक्रमी कामगिरीपेक्षा सरस कामाची नोंद होत आहे. शुक्रवारी राज्याने 3 कोटी लस मात्रांचा टप्पा ओलांडला तर आज दिवसभरात 7 लाखांहून अधिक लस देण्याची विक्रमी नोंद महाराष्ट्राच्या नावाने नोंदविण्यात आली असल्याचे आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.