उल्हासनगर मधिल मुथुट फायनान्स पडत होता दरोडा, पोलिसानी 7 जणाला थोकल्या बेळ्या.

48

उल्हासनगर मधिल मुथुट फायनान्स पडत होता दरोडा, पोलिसानी 7 जणाला थोकल्या बेळ्या.

उल्हासनगर मधिल मुथुट फायनान्स पडत होता दरोडा, पोलिसानी 7 जणाला थोकल्या बेळ्या.
उल्हासनगर मधिल मुथुट फायनान्स पडत होता दरोडा, पोलिसानी 7 जणाला थोकल्या बेळ्या.

✒अभिजीत सकपाळ, मुंबई प्रतिनिधी ✒
मुंबई,दि.27 जुन:- उल्हासनगर मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. उल्हासनगरच्या कॅम्प नं- 4 लालचक्की परिसरात मुथुट फायनान्स कार्यालय असून यामधून सोन्याची दागिने गहाण ठेवल्यावर कर्ज दिले जाते. मुथुट फायनान्स कार्यालय मध्ये मोठे घबाळ मिळेल, या आक्षेतून मुथुट फायनान्स शेजारील गाळा (दुकान) काही जणांनी भाड्याने घेऊन त्याजागी फळांचा व्यवसाय सुरू केला. दुकानाची व मुथुट फायनान्स कार्यालयाची एक भिंत सामाहिक आहे. शनिवारी रात्री 12 वाजल्या नंतर फळांच्या दुकानात काही जणांच्या संशयास्पद हालचाली होत होत्या. त्यावेळी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याची पेट्रोलिंग करणारी गाडी गेली. त्यावेळी त्यांनी दुकानात होत असलेल्या संशयास्पद हालचाली टिपून सदर प्रकार वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली.

अखेर वरिष्ठांच्या आदेशानुसार मुथुट फायनान्स कार्यालय शेजारील बंद फळांच्या दुकानाचा अंदाज घेऊन, पोलिसांनी आत मध्ये असलेल्याना बाहेर येण्यास सांगितले. पोलिसांनी आपल्यांला घेरले याचा अंदाज आलेल्या दरोडेखोरा पैकी एकाने दुकानाचे शटर उघडले. पोलिसांनी जहीर अहमद, इमामुद्दीन कासीम शेख, जिजाऊ शेख, रामसिंग, काळू शेख, आदिम शेख अश्या 7 जणांना जेरबंद करून अटक केली. सर्व दरोडेखोर झारखंड, यूपी व नेपाळ येथील आहेत. त्यांच्याकडून पिस्तुल, तलवार, गॅस कटर, ऑक्सिजन गॅस सिलेंडर, हातोडे आदी साहित्य जप्त केले. सर्व सराहित गुन्हेगार असून देशाच्या विविध पोलीस ठाण्यात त्यांच्या गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मुथुट फायनान्स व फळाची सामाहिक भिंतीला चोरीच्या उद्देशाने दरोडेखोर भगदाड पाडत असल्याचे उघड झाले. पोलिसांच्या सतर्कतेमुळे दरोड्याचा प्रयत्न फसला असून न्यायालयाने त्यांना 7 दिवसाची पोलीस कोठडी दिली.