वनहक्क पट्ट्या च्या आधारावर पीक कर्ज द्या* आदिवासी कोलाम बांधवांची जिल्हाधिकारी यांचे कडे मागणी आदिवासी कोलाम बांधव पीक कर्जाच्या योजनेपासून वंचित

57

*वनहक्क पट्ट्या च्या आधारावर पीक कर्ज द्या*

आदिवासी कोलाम बांधवांची जिल्हाधिकारी यांचे कडे मागणी

आदिवासी कोलाम बांधव पीक कर्जाच्या योजनेपासून वंचित

वनहक्क पट्ट्या च्या आधारावर पीक कर्ज द्या* आदिवासी कोलाम बांधवांची जिल्हाधिकारी यांचे कडे मागणी आदिवासी कोलाम बांधव पीक कर्जाच्या योजनेपासून वंचित
वनहक्क पट्ट्या च्या आधारावर पीक कर्ज द्या*
आदिवासी कोलाम बांधवांची जिल्हाधिकारी यांचे कडे मागणी
आदिवासी कोलाम बांधव पीक कर्जाच्या योजनेपासून वंचित

जिवती / प्रतिनिधी
संतोष मेश्राम
राजुरा तालुका प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज चंद्रपूर
Mob : 9923497800

जिवती तालुक्यातील, काकाबन, भुरियेसापुर, टाटाकोहाड, सिंगरपठार येथील गोंड, कोलाम बांधवांना दोन महिन्यांपूर्वी वनहक्क कायद्या अंतर्गत पट्टे मिळाले असून शासनाने अजूनही सातबारा दिलेला नाही यामुळे आदिवासी बंधवावर पीक कर्जाच्या योजनेपासून वंचित राहण्याची पाळी आलेली आहे.
पीक कर्ज पट्ट्या च्या आधारावर देण्यात यावा अशी मागणी आदिवासी कोलाम बांधवांनी श्रमिक एल्गार चे उपाध्यक्ष घनशाम मेश्राम यांचे नेतृत्वात जिल्हाधिकारी यांचे कडे निवेदनातून केली आहे.
जिवती तालुक्यात कोलाम बांधवांची मोठी आर्थिक लूट होत असते यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस खालावत आहे. पट्टे मिळाले असल्याने त्यांना या वर्षी पीक कर्जाची योजना मिळायला पाहिजे मात्र बँका पट्ट्या चे आधारावर कर्ज देणार नाही असे त्यांना वाटत आहे. या वर्षी पीक कर्जाच्या योजनेपासून वंचित राहू नये यासाठी जिल्हाधिकारी यांनी पुढाकार घ्यावा व पट्ट्याचे आधारावर पीककर्ज मिळवा असे मत आदिवासी बांधवांनी व्यक्त केले आहे.

पेरणी कशी बशी केली असून निंदन, खुरपन, फवारणी, खते, यासाठी दीडीने कर्ज काढावे लागते, पीक कर्ज मिळाल्यास शेती करण्याचा मार्ग सुखर होणार आहे असेही निवेदनात नमूद केले आहे.

सातबारा साठी दिरंगाई होत असल्याने पट्ट्या च्या आधारावर पीक कर्ज देण्यात यावा अशी मागणी जिवती तालुक्यातील गोंड, कोलाम, बांधवांनी केली असून या मागणीकडे जातीने लक्ष देण्याचे आव्हान त्यांनी केला आहे.

निवेदन देतेवेळी सामाजिक कार्यकर्ते घनशाम मेश्राम, इसतराव कोटणाके, मारोती सिडाम, बाळू कोटणाके, रामू कुमारे यासह इत्यादी कोलाम बांधव उपस्थित होते.