सायन कोळीवाडा मधे छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त आगळावेगळा सोहळा संपन्न

सायन कोळीवाडा मधे छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त आगळावेगळा सोहळा संपन्न

सायन कोळीवाडा मधे छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त आगळावेगळा सोहळा संपन्न

सायन कोळीवाडा मधे छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त आगळावेगळा सोहळा संपन्न

पूनम पाटगावे
मुंबई प्रतिनिधी

मुंबई :- मुंबईतील सायन कोळीवाडाच्या रावळी कॅम्प फायर ब्रिगेड जवळील सुप्रसिध्द तक्षशिला बुध्द विहार येथे दि. २६ जून २०२३ रोजी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचा आगळावेगळा सोहळा पार पडला.
भारतावर जेव्हा परकीयांचे राज्य होते, अनेक राजघराणे, संस्थान खालसा केली जात होती, जिथे स्वतः चे विचार मांडायलाही स्वातंत्र्य नव्हते. अशाकाळात सातासमुद्रापार परदेशात उच्च शिक्षण घेऊन स्वतः च्या शिक्षणाचा उपयोग स्वतः च्या राज्यातील जनतेच्या विकासासाठी अग्रसेन राहून प्रथम सर्वांना शालेय शिक्षणाचा मुलभूत अधिकार देत स्वतःच्या कलागुणातून स्वत:ची ओळख निर्माण करू देणा-या होतकरू भुमीपुत्रांना सर्वप्रथम आरक्षण लागू करणारे आणि महाराष्ट्रातील सर्व सामान्य शेतकऱ्यांना साखर कारखाने निर्माण करून जागतिक पातळीवर व्यावसायिक ओळख दिली अशा लोकराजा “राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांची जयंती महोत्सवाचे औचित्य साधून आतापर्यंत सर्व वर्गातील लहान-थोर, युवा आणि महिला वर्गाला प्रबोधन करत वास्तविक जीवन जगण्याचा सार सांगून स्वतः कर्तृत्व स्वबळावर उभे करण्यासाठी नेहमी प्रोत्साहन करणारे, इतरांना रोजगार देण्यासाठी स्वत:चा वेळ, ज्ञान वेळप्रसंगी मानधनाचा पैसा देऊन उद्योजक घडविणारे, महत्वकांक्षी, दूरदृष्टी राखणारे, प्रवचनकार आणि बौध्दाचार्य असलेले, गुरुजी म्हणून प्रख्यात असणारे आयु. जितेंद्र सखाराम कांबळे (माजलकर) गुरुजी ह्यांनी आधुनिक काळाची गरज ओळखून निसर्गाला पूरक, विना इंधनाची, विना परवान्यांची, विशिष्ट जागेची आवश्यता नसणारी, स्वतंत्र ब्रॅण्ड निर्माण करून देण्यासाठी मदतगार ठरणारी, माफक दरात उपलब्ध सर्व सामान्यांना विकत घेता येणारी, ऊन्हा-पावसारक्षित, मजबूत रचनारहित पण हवी तेव्हा हवी तिथे सहज कोणालाही आणता – नेता येईल हलक्या वजनाची कमी जागा व्यापणारी, चालता फिरता स्टॉल आणि पार्सल डिलीव्हरी अशा दोन्ही कामासाठी वापरता येणारी मुंबईमध्ये प्रथमच “जेके मोबाईल व्हॅन” चा उद्घाटन सोहळा आखून महाराजांना मानाचा मुजरा केला.
ह्यासाठी दुर्गम भागातील दुर्लक्षित आदीवासी पाड्यामध्ये जाऊन शैक्षणिक व आर्थिक पाठबळ देणारी “मैत्रांगण संस्था” चे सर्व प्रतिनिधींनी प्रामुख्याने स्वप्नील कदम ह्यांनी विशेष योगदान दिले.
तद्प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेले मध्यम वर्गातील विद्यार्थ्यांना जगाच्या कानाकोपऱ्यात पाठविण्याचा संकल्प घेतलेले “मेट्रो इन्स्टीट्यूट ऑफ कलिनरी आर्ट ॲण्ड हॉटेल मेनेजमेंट कॉलेज” चे संस्थापक आणि प्रिन्सिपल मान. राजेश धाकतोडे सर; मुंबईतील सर्व रात्रशाळा जगविण्यासाठी श्रमिक आणि होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक, माणसिक, आर्थिक पाठबळ देऊन स्वतः च्या पायावर उभे राहण्यासाठी मदतीचा हात देणा-या “मासूम संस्था” प्रतिनिधी प्रमुख युवराज सर आणि ठाकुर मॅडम; मध्यम वर्गातील सर्व बहुजनांमध्ये अर्थक्रांती घडविणारे “दी निर्मिक ग्राहक सहकारी संस्था” संचालक मंडळ सचिव विशाल पाटणकर आणि मुख्य प्रवर्तक विजय जाधव; “केंद्रीय पंतप्रधान सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME)”, शासकीय कृषी विभाग, ठाणे जिल्हा, मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हा समन्वयक अधिकारी रविंद्र तांबे सर; अबाल, निराधार, अत्याचार ग्रस्त महिलांना मानसिक सक्षमिकरण करण्यासाठी सेल्टर उपलब्ध करत स्वतः ला प्रबळ करून देत, महिलांच्या समस्या जागतिक पातळीवर नेणा-या “ऊर्जा संस्था” संचालिका दिपाली मॅडम; शिक्षणाचा मुलभूत अधिकार देण्यासाठी आणि भारतीय संविधान जनजागृती अभियान राबविणारे “भारतीय प्रजासत्ताक संघटना” संचालक अमोलकुमार बोधीराज सर; “प्रक्षिक एज्युकेशन ॲण्ड रिसर्च फाउंडेशन” चे संचालक आनंद साळवी सर; ‘तक्षशिला महिला बचत गट’ च्या सचिव कौशल्या शिंदे आणि “शांतीदुत बुध्द विहार बौध्दजन सेवा संघ” च्या आशाताई आणि त्यांच्या सहकारी महिला मंडळ; ‘बौध्दजन पंचायत समिती शाखा क्र. ७५६’ चे माजी चिटणीस समाजसेवक दिलीप कांबळे सर; ‘बौ. पं. स. शाखा क्र. ५३९’ चे सरचिटणीस संदिप जाधव सर; ‘शिवनेरी युवा प्रतिष्ठान’ चे अध्यक्ष सुमित यांच्यासह विभागीय सामाजिक संघटना, तरुण मंडळ, महिला मंडळ, महिला बचत गट, स्थानिक “तक्षशिला बुध्द विहार कमिटी”, “आदर्श सामाजिक प्रतिष्ठान” चे आजी माजी पदाधिकारी आणि सभासद बहुसंख्येने उपस्थित राहून ह्या सोहळ्यात सहभागी झाले.
दरम्यान जागतिक पातळीवर महाराष्ट्रीय बॅण्ड असलेले “सेलिब्रेशन झोन केक शॉप टीम” कडून अल्पोपहार वाटप करून नव्या व्यवसायाच्या प्रारंभी आनंद व्यक्त केला. शेवटी सन्माननीय यजमान कांबळे गुरुजींनी सर्वांचे आभार मानत असताना महामानवांच्या जयंती त्यांच्या विचारांना स्वत: जबाबदारी स्विकारून प्रत्यक्ष कृतीतून दाखल्यासहित जगासमोर मांडत नव्या पिढीला दिशा देणे हि काळाची गरज आहे आणि तिच महामानवांना आदरांजली होईल, ह्या वाक्याने उपस्थितांना नवचैतन्य निर्माण करून दिले.
असआ हा लोकराजा “राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांचा जयंती महोत्सव” आगळ्यावेगळ्या पध्दतीने साजरा करत मानाचा मुजरा दिला.