रेल्वेच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

रेल्वेच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

रेल्वेच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

रेल्वेच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

राजुरा : 27 जून
रेल्वेच्या धडकेत एका बिबट्याचा मृत्यू झाला. ही घटना राजुरा वनपरिक्षेत्रातील चनाखा कक्ष क्रमांक 160 मध्ये घडली.
लोहमार्ग जंगलव्याप्त भागातून जात असून, मालवाहतूक व प्रवासी वाहतूक या मार्गावरून होत असते. गेल्या काही दिवसात रेल्वेच्या धडकेने वन्यप्राण्यांच्या मृत्यूच्या अनेक घटना घडल्या आहेत. विशेष म्हणजे, यापूर्वी याच मार्गावर वाघांचा मृत्यू झाला आहे. वारंवार घडणार्‍या अशा अप्रिय घटानांनी वन्यप्रेमीमध्ये नाराजी असून, वनविभाग आणि रेल्वे प्रशासनाने तात्काळ उपाययोजना कराव्या, अशी मागणी जोर धरू लागली आहे. घटनेचा तपास राजुरा वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश येलकेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
तात्काळ रेल्वे लोहमार्ग परिसरात जाळी बसवून व अन्य उपाययोजना करून या वन्यप्राण्यांचे नाहक बळी जाणार नाही याची काळजी रेल्वे व वनविभाग प्रशासनाने घ्यावी, अशी मागणी नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे राज्य अध्यक्ष बादल बेले यांनी केली आहे. तर तारेचे कुंपण, संरक्षण भिंत बांधण्याची मागणी केली जात आहे. पण, त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे वन्यजीवांना प्राण गमवावे लागत असल्याचे मत वन्यजीव प्रेमी संतोष कुंदोजवार यांनी व्यक्त केले आहे.