परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीच्या नवीन जाचक अटी रद्द करा • आ. जोरगेवार यांची मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे मागणी

परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीच्या नवीन जाचक अटी रद्द करा
• आ. जोरगेवार यांची मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे मागणी

परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीच्या नवीन जाचक अटी रद्द करा • आ. जोरगेवार यांची मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे मागणी

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

चंद्रपूर : 27 जून
बहुजन विद्यार्थ्यांसाठी शिक्षण शिष्यवृत्तीच्या नवीन जाचक अटी रद्द करण्यात याव्यात, अशी मागणी आ. किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
राज्यातील अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीय (बहुजन) विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिक्षणासाठी शासनाकडून पुरवण्यात येणार्‍या शिष्यवृत्ती मध्ये घालण्यात आलेल्या नवीन जाचक अटींमध्ये दहावी, बारावी आणि पदवी परीक्षेत 75 टक्के गुण मिळवणे अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच शिक्षण शुल्क 30 ते 40 लाख रुपयांपर्यंत मर्यादित करण्यात आले आहे. यामुळे अनेक बहुजन विद्यार्थ्यांचे परदेशात शिक्षण घेण्याचे स्वप्न भंग होणार आहे. ही बाब लक्षात घेता, बहुजन विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीच्या नवीन जाचक अटी रद्द करण्यात याव्यात, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे आ. जोरगेवार यांनी केली आहे.
अनेक विद्यार्थ्यांनी जगप्रसिद्ध विद्यापीठांमध्ये प्रवेश घेऊन यशस्वीरित्या शिक्षण पूर्ण केले आहे. मात्र, आता 75 टक्के गुणांची अट घातल्याने अनेक विद्यार्थी तणावाखाली आहेत. ही बाब लक्षात घेता, परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्तीसाठी 75 टक्के गुणांची अट, शिक्षणासाठी रक्कम मर्यादा, कुटुंबातील एकाच विद्यार्थ्याला लाभ, आणि 8 लाख रुपयांच्या उत्पन्न मर्यादेच्या अटी रद्द करून पूर्वीप्रमाणे बहुजन विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, अशी मागणी आ. जोरगेवार यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here