उज्वल व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र साकोली येथे जागतिक अमलीपदार्थ विरोधी दिवस व राजश्री शाहू महाराज यांची जयंती कार्यक्रम
मनोज एल खोब्रागडे
✍️सहसंपादक✍️
मो 9860020016
साकोली :- शिलवंत बहुुउद्देशिय विकास संस्था जाख द्वारा संचालित उज्वल व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र साकोली येथे दि. 26/06/2025 रोजी, नशामुक्ती भारत अभियाना अंतर्गत जागतिक अमलीपदार्थ विरोध दिनानिमित्त हा दिवस साजरा करण्यात आला त्याचबरोबर राजश्री शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली, याप्रसंगी संचालिका उषा घोडेस्वार यांनी अमली पदार्थामुळे होणारे दुष्परिणाम, त्यात वाहत चाललेली तरुणाई, याबद्दल मार्गदशन करून, आपण सर्व नशामुक्त भारत अभियानात एकजूट होऊन बदलायची सुरुवात स्वतःपासूनच करू असे सांगून अमली पदार्थ विरोधी दिनाची प्रतीज्ञा घेतली, कार्यक्रमाचे प्रस्थाविक मा. शिलवंत घोडेस्वार यांनी करून स्वानुभव कथित केले, तसेच मा. गंगाधर धुवाधपारे सर यांनी नशेविरुद्ध अंमलबजावणी कशी करावी याबद्दल मार्गदर्शन केले. यानिमित्त उज्वल व्यसनमुक्ती केंद्र साकोली संचालिका मा. उषा घोडेस्वार, केंद्राचे व्यवस्थापक मा. शिलवंत घोडेस्वार व केंद्र प्रमुख मा. गंगाधर धुवाधपारे, संस्थेचे कोषाध्यक्ष मा. विवेक खोब्रागडे, नर्स जयश्री चिमनकर, रोहिणी गजभिये, अमित बर्वे, विशाल मेश्राम हे उपस्थित होते. सर्व मान्यवर व कर्मचारी वर्ग यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम अत्यंत व्यवस्थितरित्या पार पडला.