भिवंडी छत्रपती शिवाजी महाराज चौकाचे सुशोभीकरण होणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज चौकाचे सुशोभीकरण
अभिजीत आर. सकपाळ
ठाणे ब्युरो चीफ
9960096076
भिवंडी :- भिवंडी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात ३८ वर्षांपूर्वी उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याची दुरवस्था झाली आहे. या चौकाच्या नूतनीकरणाच्या कामाचा शुभारंभ आमदार महेश चौघुले यांच्या हस्ते तर शिवसेना (शिंदे गट) शहरप्रमुख सुभाष माने, व भाजपा शहराध्यक्ष रवी सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. नजराणा सर्कल येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी नव्याने पुतळा उभारणे व चौकाचे सुशोभीकरण करण्याची मागणी नागरिकांकडून अनेक वर्षे केली जात होती. या कामासाठी सहा कोटी रुपये मंजूर केल्यानंतर या परिसरात नव्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा व सुशोभीकरण करण्यात येत आहे. तसेच याप्रसंगी शहरातील असंख्य शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते.