महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोग यांचा भिवंडी महानगरपालिकेत दौरा.
अभिजीत आर. सकपाळ
ठाणे ब्युरो चीफ
9960096076
भिवंडी : भिवंडी मा.श्री. शेरसिंग रुक्कानसिंग डागोर, अध्यक्ष (राज्य मंत्री दजी) महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोग यांची दि.२६/०६/२०२५ रोजी भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेस भेट दिली यावेळी सफाई कामगारांचे विविध समस्यांबाचत मा. प्रशासक तथा आयुक्त अनमोल सागर (भा.प्र.से) यांच्या समवेत आढावा बैठक पार पडली. या प्रसंगी सफाई कर्मचा-यांच्या सेवा सुविधा देणेबाबत तसेच
त्यांना पदोन्नती देणेबाबत सुचना दिल्या तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजनेअंतर्गत २५ वर्षे सेवा केलेल्या कर्मचा-यांस मोफत घर देण्यात यावे. तसेच जे कर्मचारी शासकीय वसाहतीत मागील ३५ वर्षापासून योजनेंतर्गत सलग
घरात वास्तव्य करतात त्यांचे नावे पट्टा करावा असे नमूद केले आहे तसेच कर्मचाऱ्यांना हॅन्ड ग्लोज, मास्क, रेनकोट, व इतर सुविधा देणे, त्यांची वैद्यकीय तपासण्या वेळोवेळी घेण्यात याव्यातच व इतर जास्तीत जास्त सुविधा देणेबाबत अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सफाईकर्मचारी आयोग यांनी सुचीत केले. मा. प्रशासक तथा आयुक्त यांनी
महानगरपालिकेकडून आरोग्य कर्मचा-यांना देण्यात येणा-या सेवा व योजनांचे सादरीकरण केले. यावेळी मा. श्री. शेरसिंग रुक्कानसिंग डागोर, अध्यक्ष राज्य मंत्री दर्जा महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोग यांनी केलेले सादरीकरण पाहुन समाधान व्यक्त केले, व उपस्थित सर्वांचे महानगरपालिकेकडून आभार व्यक्त करुन बैठक समाप्त करण्यात आली. तसेच या प्रसंगी मा.अतिरीक्त आयुक्त विठ्ठल डाके, मा. उप-आयुक्त (मुख्यालय) विक्रम दराडे, मा. सहा-आयुक्त शैलेश दोंदे , शहर अभियंता श्री.जमिल पटेल, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. रामप्रसाद सोळुंके, सहा. आयुक्त (प्रशासन) श्री. अजित महाडीक, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, डॉ. संदिप गाडेकर, तसेच कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी, प्रतिनीधी व अन्य अधिकारी / कर्मचारी उपस्थित होते