राजेश बारसागडे यांना महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर.

राजेश बारसागडे यांना महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर.

मनोज एल खोब्रागडे
✍🏻सह संपादक✍🏻
मो 9860020016

चंद्रपूर :- महाराष्ट्र राज्य शासनाचे पत्रकारिता पुरस्कार मंगळवार दि. 24 जून रोजी जाहीर करण्यात आले.यामध्ये पत्रकार राजेश देवराव बारसागडे यांना उत्कृष्ट पत्रकारितेसाठी ग.त्र्यं. माडखोलकर पुरस्कार- 2023 (नागपूर विभाग) जाहीर करण्यात आला.
चंद्रपूर जिल्हा नागभीड तालुक्यातील सावरगाव येथील राजेश देवराव बारसागडे हे मागील 20 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत.आजपर्यन्त त्यांनी समाजातील तळागाळातील लोकांवर समस्यात्मक,
सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक,शैक्षणिक,शेतीविषयक आदिं विषयात विपुल लेखन केले आहे.त्यांनी सामाजिक व साहित्यिक क्षेत्रात सुद्धा मोलाचे कार्य केले आहे.त्यांच्या “कोंबडा झाला घड्याळ” या बालकाव्य संग्रहास महाराष्ट्र शासनाचा “बालकवी” पुरस्कार (सन 2012)प्राप्त झाला आहे.तसेच त्यांच्या ‘चार तरंग अस्वस्थतेचे’
प्रातिनिधिक चारोळी संग्रह
(4 कवी),’कोंबडा झाला घड्याळ’-बालकविता संग्रह,’तू कधीच समजून घेतलं नाही’- ललित संग्रह ह्या 3 साहित्य कृती प्रकाशित आहेत.त्यांचे साहित्य महाराष्ट्रातील विविध वृत्तपत्रे, साप्ताहिकं,नियतकालिके व मासिकात प्रकाशित झाले आहेत.तसेच त्यांचे हिंदी साहित्य सुद्धा “राज” या नावाने प्रकाशित झाले आहेत.यांसह त्यांचे अनेक ठिकाणी सन्मान,सत्कार,गौरव झालेला आहे.व महाराष्ट्रातील विविध ठिकाणहुन पुरस्कार प्राप्त झाले आहेत.