एक झाड – एक श्वास – एक शिकलेला विद्यार्थी” हा आमचा विश्वास!
ठाणे: न्यू प्रगती शैक्षणिक संस्था (रजि.) यांच्या वतीने “झाडे लावा, झाडे जगवा” या उपक्रमांतर्गत मंगला स्कूल, कोपरी, ठाणे येथे वृक्षारोपण करण्यात आले.
या उपक्रमासाठी सचिव मा. अनिता खरात मॅडम, सदस्य मा. सुनीता सोनवणे आणि मा. सारिका गडांकुश यांनी विशेष सहभाग घेतला. वाढत्या शहरीकरणामुळे झाडांची संख्या लक्षणीय कमी होत चालली आहे. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे. याला प्रतिबंध करण्यासाठी संस्थेने झाडे लावून समाजात सकारात्मक संदेश दिला.
संस्थेचे कार्य व सामाजिक योगदान
न्यू प्रगती शैक्षणिक संस्था गेल्या १६ वर्षांपासून आदिवासी, स्थलांतरित, आर्थिकदृष्ट्या दुर्बल व शिक्षणापासून वंचित मुलांसाठी कार्यरत आहे. संस्था मोफत बालशिक्षण, महिला सक्षमीकरण आणि स्वयंरोजगार प्रशिक्षण यांवर लक्ष केंद्रित करून काम करत आहे. मुंबई, ठाणे, पालघर, वाडा, नालासोपारा आणि रायगड जिल्ह्यांमध्ये संस्थेच्या ५३ बालवाड्या व अंगणवाड्या कार्यरत आहेत.
विशेष बाब
संस्थेला शासनाकडून कोणतीही आर्थिक मदत मिळत नाही, तरीही समाजातील गरजूंसाठी उपक्रम सातत्याने राबवले जातात. या कार्यामागे संस्थेचे अध्यक्ष: मा. गणेश खरात, उपाध्यक्ष: मा. सुनील कांबळे, खजिनदार: मा. अॅड. चंद्रकांत सोनवणे, सहसचिव: मा. इंजि. महेश गडांकुश, सदस्य: मा. विजय काळे तसेच सर्व शिक्षक व पदाधिकारी यांचे विशेष सहकार्य लाभते.
संस्थेच्या वतीने आवाहन
समाजातील दानशूर व संवेदनशील व्यक्तींनी संस्थेला सहकार्य करावे, जेणेकरून अधिकाधिक बालवाड्यांमधून गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि पर्यावरणप्रेमी संस्कार रुजवता येतील.
सहकार्यासाठी संपर्क करा
9768134606 / 9320635818 / 8898186859