जेष्ठ नाभिक समाज कार्यकर्त्या संगीता महाजन यांचा ‘योगरत्न’ पुरस्काराने सन्मान

233

२० वर्षाच्या प्रदीर्घ सेवेची दखल घेत आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसियेशन यांच्या वतीने हा पुरस्कार देण्यात आला.

संजय पंडित 

दि.२७, ठाणे : ठाण्यातील हठयोगी निकम गुरुजींच्या अंबिका योगा कुटीर मधील नामवंत योगा शिक्षिका, अंबरनाथ योगा केंद्राच्या संचालिका तथा जेष्ठ नाभिक समाज कार्यकर्त्या संगीता अधिक महाजन यांना नुकतेच ‘योगरत्न’ या प्रतिष्टेच्या समजल्या जाणाऱ्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. योगा क्षेत्रात ख्याती असलेल्या ठाण्यातील अंबिका योगा कुटीर मधील त्यांच्या आजवरच्या २० वर्षाच्या प्रदीर्घ सेवेची दखल घेत आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसियेशन यांच्या वतीने हा पुरस्कार दिला आहे.छत्रपती संभाजी नगर येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित केलेल्या दिमाखदार सोहळ्यात हा मानाचा पुरस्कार देण्यात आला.आयुष मेडिकल असोसिएशन,एजीएमए आणी अजित पवार गटाचा राष्ट्रवादी पक्षाच्या डॉक्टर सेल मधील आयुष विभागाने या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. दरम्यान या दिमाखदार पुरस्कार सोहळ्याला महाराष्ट्रातील नामवंत योगशिक्षक, योग थेरपीस्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रमुख पाहुण्यांमध्ये शिक्षण सम्राट समजल्या जाणारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी डॉक्टर सेलचे प्रदेश अध्यक्ष डॉ. बाळासाहेब पवार हे कार्यक्रमाचे अध्यक्ष व उद्घाटक म्हणून उपस्थित होते तर सोबत पाहुण्यांमध्ये उद्योजक मनोज दांडगे उपस्थित होते. इतर प्रमुख उपस्थितीमध्ये डॉ नितीन राजे पाटील आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन व्हाईस चेअरमन तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी डॉक्टर सेल प्रदेश कार्याध्यक्ष (आयुष विभाग) डॉ. सतीश कराळे चेअरमन आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन,डॉ बाबुराव कानडे अध्यक्ष आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन, दिशा चव्हाण,प्रशांत सावंत, प्राध्यापक कुणाल महाजन, श्री मनोहर कानडे, व इतर आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

संगीता अधिक महाजन यांना हा मानाचा पुरस्कार मिळाल्या बद्दल त्यांच्या Actually गौरव करताना सर्वच थरातून त्यांचे कौतुक होत असुन ठाणे जिल्हातील विविध संघटना देखील त्यांचे अभिनंदन करुन त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करीत आहेत.