अकोला जिल्ह्यात 10 हजार 236 घरांचे नुकसान;* *पंचनाम्याबद्दल आक्षेप असल्यास दि. 29 पर्यंत नोंदविण्याचे आवाहन*
अकोला जिल्ह्यात 10 हजार 236 घरांचे नुकसान;* *पंचनाम्याबद्दल आक्षेप असल्यास दि. 29 पर्यंत नोंदविण्याचे आवाहन*

*अकोला जिल्ह्यात 10 हजार 236 घरांचे नुकसान;*

*पंचनाम्याबद्दल आक्षेप असल्यास दि. 29 पर्यंत नोंदविण्याचे आवाहन*

अकोला जिल्ह्यात 10 हजार 236 घरांचे नुकसान;* *पंचनाम्याबद्दल आक्षेप असल्यास दि. 29 पर्यंत नोंदविण्याचे आवाहन*
अकोला जिल्ह्यात 10 हजार 236 घरांचे नुकसान;*
*पंचनाम्याबद्दल आक्षेप असल्यास दि. 29 पर्यंत नोंदविण्याचे आवाहन*

मनोज खोब्रागडे✍
मध्य महाराष्ट्र ब्युरो चीफ
मिडीया वार्ता न्यु-8208166961

अकोला : – जिल्ह्यात दि. 21 ते 23 पर्यंत अतिवृष्टीत झालेल्या घरांच्या नुकसानीबाबत 426 बाधित गावापैकी 299 गावांचे पंचनामे पूर्ण झाले आहे. त्यात नुकसान झालेल्या घरांची संख्या 10 हजार 236 आहे. त्यात अंशत: नुकसान 9965 तर पुर्णत: नुकसान झालेल्या घरांची संख्या 271 आहे. दरम्यान झालेल्या पंचनाम्यांबद्दल कुणास आक्षेप असल्यास त्यांनी तो संबंधित तहसिलदार कार्यालयात गुरुवार दि. 29 जुलै पर्यंत नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.

पंचनाम्याची सविस्तर माहिती याप्रमाणे : अकोला तालुका बाधीत गावे 183, पंचनामा झालेली गावे 160, नुकसान झालेल्या घरांची संख्या 8620(अंशत: 8400,पुर्णत:220), क्षतिग्रस्त दुकाने 234, बार्शीटाकळी तालुका बाधीत गावे 140, पंचनामा झालेली गावे 35, नुकसान झालेल्या घरांची संख्या 197(अंशत: 197,पुर्णत:शुन्य), अकोट तालुका बाधीत गावे 31, पंचनामा झालेली गावे 31, नुकसान झालेल्या घरांची संख्या 196(अंशत:196,पुर्णत: शुन्य), तेल्हारा तालुका बाधीत गावे 12, पंचनामा झालेली गावे 12, नुकसान झालेल्या घरांची संख्या 19(अंशत: 18,पुर्णत:एक), बाळापूर तालुका बाधीत गावे 55, पंचनामा झालेली गावे 55, नुकसान झालेल्या घरांची संख्या 1188(अंशत: 1138,पुर्णत:50), पातूर तालुक्यात नुकसान नाही. मुर्तिजापूर तालुका बाधीत गावे सहा, पंचनामा झालेली गावे सहा, नुकसान झालेल्या घरांची संख्या 16(अंशत: 16,पुर्णत: शुन्य).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here