जिल्हा प्रशासन मिशन मोडवर ; जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी बाधित तालुक्यात ठाण मांडून*
जिल्हा प्रशासन मिशन मोडवर ; जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी बाधित तालुक्यात ठाण मांडून*

*जिल्हा प्रशासन मिशन मोडवर ; जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी बाधित तालुक्यात ठाण मांडून*

जिल्हा प्रशासन मिशन मोडवर ; जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी बाधित तालुक्यात ठाण मांडून*
जिल्हा प्रशासन मिशन मोडवर ; जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी बाधित तालुक्यात ठाण मांडून*

मनोज खोब्रागडे✍
मध्य महाराष्ट्र ब्युरो चीफ
मिडीया वार्ता न्यू-8208166961

सातारा दि. 27 (जिमाका) : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने मुळे पश्चिम भागातील वाई, महाबळेश्वर, जावली, पाटण व काही प्रमाणात सातारा तालुक्यात अनेक ठिकाणी रस्ते खचले, शेतीचे नुकसान झाले आहे. नदीवरील पुलांचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी भूस्खलन झाले.दुर्देवाने तिथे जिवीत हानीही झाली आहे. या सर्व नागरिकांना तात्काळ मदत मिळावी, नुकसानीचे पंचनामे जलगगतीने होण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी संबंधित यंत्रणांना तात्काळ पंचनामे करुन त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश आज दिले. स्वतः जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी महाबळेश्वर येथे सर्व यंत्रणांचा आढावा घेतला.
अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांना पाटण तालुक्यातील भूस्खलन झालेल्या गावांचे पंचनामे तात्काळ करुन तसेच त्या गावांचे तात्काळ पुनर्वसन व्हावे यासाठी कोयना नगर येथे ठाण मांडून आहेत, त्यांनी आज संबंधित यंत्रणांची बैठक घेतली तर पाटण तालुक्यातील अविृष्टीमुळे रस्त्यांचे, शेतीचे तसेच नुकसान ग्रस्त भागांचे पंचनामे करण्याबाबत उपजिल्हाधिकारी संयज आसवले यांना तात्पुरत्या स्वरूपात नियुक्त केले आहे. ते पाटण उपविभागीय अधिकारी यांचे बरोबर काम करत आहेत.
महाबळेश्वर येथील नुकसानीचे पंचनामे तात्काळ पूर्ण करण्याची जबाबदारी उपजिल्हाधिकारी रामहरी भोसले यांचेवर सोपविली आहे. ते उपविभागीय अधिकारी यांच्या सोबत हे काम बघत आहेत. संबंधित यंत्रणा पंचनामे, आणि तात्पुरत्या डागडुजी, रस्ते धुरस्तीचे कामं युद्ध पातळीवर करत आहेत.
सर्व संबंधित यंत्रणांना शेतीची पंचनामे, बाधित कुटुंबांचे पंचनामे करुन त्याचा अहवाल सादर करण्याचे, तसेच रस्त्यांच्या व पुलांच्या दुरुस्तीबाबत त्वरीत कार्यवाही करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी यांनी यावेळी केल्या.
केळघर -वाहिते खचलेल्या रस्त्याचे काम करण्यात आले आहे. विविध तालुक्यात पंचनाम्याचे काम सुरु आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here