*पुरग्रस्त बांधकाम कामगारांना तातडीची मदत 25,000 द्या.तसेच त्यांच्या पडझड झालेल्या घरांचे मंडळाच्या मार्फत तात्काळ पुर्णवसन कारावे.*
_अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघ सांगली जिल्हाध्यक्ष संजय कांबळे यांची मागणी_

_अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघ सांगली जिल्हाध्यक्ष संजय कांबळे यांची मागणी_
✒ संजय कांबळे ✒
सांगली जिल्हा प्रतिनिधी
📞 9890093862
सांगली दि २७
पुरग्रस्त बांधकाम कामगारांना तातडीची मदत 25,000 द्या.तसेच त्यांच्या पडझड झालेल्या घरांचे मंडळाच्या मार्फत तात्काळ पुर्णवसन कारावे अशी मागणीचे निवेदन अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघ सांगली जिल्हाध्यक्ष संजय कांबळे यांचे शिष्टमंडळाने सांगली जिल्हा कामगार आयुक्त मा.अनिल गुरव साहेब यांच्यामार्फत,
मा.मुख्यमंत्रीसाहेब,मा.कामगार मंत्री साहेब,तसेच पालक मंत्री साहेब,आणि महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष साहेब यांना करण्यात आली आहे.
या निवेदनात असे म्हटले आहे की,सांगली जिल्ह्यात महापुराने रौद्ररूप धारण केले असून पूरपट्टात राहत असणारे अनेक बांधकाम कामगार बेघर झालेले आहेत.त्यांचे जनजीवन विस्कळीत व उध्वस्त झाले आहे.या आदीही सन 2019 च्या महापुरामध्ये त्यांच्या संसाराची मोठी हानी झाली होती.ते कसेबसे सावरता सावरता कोरोना सारख्या महाभयाकर रोगामुळे काम धंदा बंद पडून रोजच्या रोजी रोटीला महाग झाले आहेत.आशा गंभीर परिस्थितीला तोंड देत असतानाच महापुरामुळे सांगली,मिरज शहरातील तसेच ग्रामीण भागातील वारणा व कृष्णा नदी काठावर तसेच पुरपट्यात राहत असणाऱ्या जवळपास ऐंशी हून अधिक गावात तसेच वाडी वस्तीत राहत असणाऱ्या कामगारांची घरे पाण्या खाली गेलीआहेत,त्यांच्या संसार उपयोगी जीवन आवश्यक वस्तू पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या आहेत.त्यांमुळे अशा गंभीर परिस्थितीमध्ये जीवन जगणे मुश्किल झाले आहे.या नैसर्गिक आपत्तीचा विचार करून महाराष्ट्र शासनाने पुरग्रस्त बांधकाम कामगारांचे घरपट्टी,पाणी पट्टी,विद्युत बिल तसेच सर्व शासकीय देय माफ करावेत.त्याचबरोबर त्यांना,महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्याकडे शिल्लक असणाऱ्या रक्कमेमधुन प्रत्येक पुरग्रस्त बांधकाम कामगारांना तातडीची मदत म्हणून 25,000 रूपये देण्यात यावे,आणि संसार उपयोगी भांडी आणि जीवन आवश्यक वस्तू देण्यात यावेत.तसेच महापुरामध्ये कामगारांच्या घराची पडझड झालेल्या नोंदणीकृत कामगारांना मंडळाच्या मार्फत ग्रामीण भागाप्रमाणे हक्काचे पक्के घर बांधण्यास अर्थसहाय्य करून त्यांचे सुरक्षित ठिकाणी पुर्णवसन करावे.अशी मागणी,ॲड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या अखिल महाराष्ट्र कामगार – कर्मचारी संघ,महाराष्ट्र राज्य सांगली जिल्हाध्यक्ष संजय कांबळे यांनी,सांगली जिल्हा कामगार आयुक्त मा.अनिल गुरव साहेब यांच्यामार्फत,मा.मुख्यमंत्री साहेब,कामगार मंत्री साहेब व सांगली जिल्ह्याचे पालक मंत्री साहेब यांच्या बरोबरच महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे मा.अध्यक्ष यांच्याकडे केली आहे.त्यावेळी अखिल महाराष्ट्र कामगार – कर्मचारी संघाचे जनरल सेक्रेटरी मा.संजय संपत कांबळे(दिपंकर) तसेच सदस्य युवराज कांबळे,चंद्रकांत कांबळे,हुशेन मेस्त्री,विक्रांत सादरे,हिरामण भगत,सर्जेराव सावंत,सहदेव कांबळे,निलेश जगधने,महादेव कुकडे,सलीम शेख,अशोक माळी,ओंकार जाधव,अमित पाटील,विक्रांत गायकवाड, सावंत यांच्या सहीत अनेक पुरग्रस्त बांधकाम कामगार उपस्थित होते.