राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघ व सहयोगी संघटना मार्फत जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर “आक्रोश रॅली”

मिडिया वार्ता न्युज
पाचोरा तालुका प्रतिनिधी
✒ ईसा तडवी ✒
मो. 7666739067
*महाराष्ट्र शासनाने १८ फेब्रुवारी,२० एप्रिल व ७मे २०२१ च्या पद्दोन्नतीतील आरक्षण विरोधी शासन निर्णयाच्या विरोधात राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघाने महाराष्ट्रातील ३६ जिल्हे व ३५८ तालुक्यात ४ चरणात आंदोलन केले.*
*आज चौथ्या चरणांतर्गत ३६ जिल्ह्यात आक्रोश मोर्चा काढण्यात आला.*
*राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघ जळगाव शाखेमार्फेत जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर “आक्रोश मोर्चा”काढण्यात आला.*
*आक्रोश मोर्चा इंडिया गॅरेज ते जिल्हाधिकारी कार्यालय असा काढण्यात आला
*मोर्चाचे नेतृत्व सुमित्र अहिरे (खान्देश प्रभारी)यांनी केले.*
*१)अनु.जाती,जमाती,भटके विमुक्त, विशेष मागास प्रवर्ग व इतर मागासवर्गीय कर्मचारी यांना पदोन्नतीतील आरक्षण तात्काळ लागु करावे.*
*२) महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण व नोकरीतीलआरक्षण विरोधी नितीच्या विरोधात*
*३) महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत येणा-या सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांची बिंदुनामावली अद्यावत करुन नियमबाह्य पद्धतीने करण्यात येणारी भरती प्रक्रिया बंद करावी.*
*४) ओबीसी प्रवर्गास पदोन्नतीत आरक्षण तात्काळ लागु करण्यात यावे.*
*५) कर्मचाऱ्यांना डिसीपीएस व एनपीएस योजना लागु करु नये.*
*६)असंघटित क्षेत्रातील कामगारांची तात्काळ नोंदी करण्यात याव्यात.*
*७) महाराष्ट्रात अन्यायकारक शेतकरी विरोधी कायदे तात्काळ रद्द करण्यात यावे.*
*८) महाराष्ट्रात कामगार हिताच्या विरोधात असलेले कायदे रद्द करण्यात यावे.*
*९)मराठा समाजाला संवैधानिक आरक्षण तात्काळ लागु करावे.*
*१०)शिक्षण सेवक,गटसाधन केन्द्रातील साधनव्यक्ती व विषय तज्ञ यांना नियमित वेतनश्रेणी देण्यात यावी.*
*११) अंगणवाडी सेविका व मदतनीस तसेच आशावर्कर यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा.*
==================
*जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना किशोर नरवाडे(समिक्षा प्रभारी जळगांव जिल्हा),रेखा मेश्राम(महाराष्ट्र राज्य सदस्या RMBKS HEALTH), वैशाली भालेराव(RMBKS CIVIL),सुनिता लांडगे(RMBKS) व प्रकाश इंगळे(जळगाव जिल्हा अध्यक्ष बामसेफ) यांनी निवेदन दिले.*
==================
*जिल्हाधिकारी कार्यालय येथे या आक्रोश मोचिकणेअडवण्यात आला.या प्रसंगी विलास चिकणे(जिल्हा कोषाध्यक्ष बामसेफ), विश्वास पाटील(जळगाव जिल्हा अध्यक्ष राष्ट्रीय किसान मोर्चा) व प्रा.डॉ.प्रकाश कांबळे (प्रोटान)यांनी मार्गदर्शन केले.*
*🌷या संघटनांनाचा सहभाग*🌷
*१) राष्ट्रीय किसान मोर्चा*
(प्रविण सोनवणे, विश्वास पाटील, चंद्रकांत जगदाळे)
*२) राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा*
(अमजदभाई, इरफान भाई शेख, रियाज शेख)
*३)कास्ट्राईब संघटना (एस.टी.)* (वाडे साहेब,शैलेश नन्नवरे)
*४)बुध्दिष्ट इंटरनॅशनल नेटवर्क(रविंद्र वाडे, आधार करंदीकर)*
*५)प्रोटान(गणेश काकडे, मिलिंद निकम, मिलिंद भालेराव, प्रकाश सोनवणे,मुलचंद पवार,आनंद जाधव,घोडे सरर)*
*६) राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघ, (आरोग्य शाखा)रेखा मेश्राम, सुनिता लांडगे,वैशाली भालेराव, महेंद्र वळवी,अनुजा कदम, इ.)*
*७)भारत मुक्ती बेरोजगार(राहुल सपकाळे,)*
*८) बहुजन क्रांती मोर्चा(सुनील देहाडे,सुनिल पाटील)*
*९)पॅंथर सेना(किनगाव)*
*१०) राष्ट्रीय मुलनिवासी महिला संघ(वंदना नरवाडे,पुजा पवार,इंगळे ताई,चिकने ताई, घोडेस्वार ताई तायडेमॅडम भद्रे मॅडम)*
*११) असंघटित क्षेत्र कर्मचाऱी संघ(कुंदन तायडे,*
*१२)भारतीय बेरोजगार मोर्चा*
*१३) राष्ट्रीय किन्नर मोर्चा(बेबोदिदी,सुनिता दिली)*
*१४) राष्ट्रीय गुरु रविदास र्क्रांती मोर्चा(शशिकांत मोरे)*
*१५) राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद(खुमानसिंग बारेला,गेमा बारेला, गोपाळ बाविस्कर, महेंद्र वळवी)*
*१६)विष्णु वानखेडे (RMBKS RAILWAY)*