आलापल्ली वनपरिक्षेत्रात कासवाला दिले जीवनदान

आलापल्ली वनपरिक्षेत्रात कासवाला दिले जीवनदान

आलापल्ली वनपरिक्षेत्रात कासवाला दिले जीवनदान
अहेरी तालुका प्रतिनिधी
स्वप्निल श्रीरामवार
मो न 8806516351

आलापल्ली वन परीक्षेत्रात ग्रेड वन चा प्राणी कासवाला एका जागरूक नागरिकाच्या सहाय्याने कासवाला जीवनदान देण्यात आले
सविस्तर असे की,
आलापल्ली येथील वाहन चालक शैलेश भास्कर कट्टावार याला आलापल्ली कडे येत असताना रस्त्यावर एक कासव मिळाला सदर कासव बहुधा जखमी असावा असे त्याला वाटले,
त्यामुळे तो कासव तो सोबत घेऊन आला आणि त्याने वनरक्षक डी एस चिव्हाने यांच्याशी संपर्क करून तो कासव त्यांच्या सुपूर्द केला,
सदर कासवाला पशुवैद्यकीय अधिकारी डा. अतुल उरकुडे आणि निलेश गंगावणे तसेच सुदाम चिंचोडे यांनी उपचार करून पूर्णबरा असल्याचे प्रमाणपत्र दिले त्यामुळे त्या कासवाला कंपार्टमेन्ट नंबर 8 मध्ये भरपूर पाणी असलेल्या ठिकाणी त्यांच्या अधिवासात उपवनसंरक्षक राहुलसिंग तोलिया यांच्या हस्ते सोडण्यात आले, प्रसंगी
सहाय्यक उपवनसंरक्षक नितेश देवगडे, वनपरिक्षेत्र अधिकारी आलापल्ली योगेश शेरेकर, वनपाल अनिल झाडें, ऋषीं तावाडे, प्रकाश राजूरकर, डी एस चिव्हाने, ऋषी मडावी, चंदू सडमेक, उमाजी गोवर्धन, बंडू रामगिरवार, सचिन डांगरे आदी उपस्थित होते,
प्रसंगी त्यांनी शैलेश कट्टावार या युवकाच्या कार्याची स्तुती केली आणि कोणत्याही वन्य प्राणी ची हत्या करणे, किंवा त्याला बंधनात ठेवणे हा गुन्हा आहे, नागरिकांनी जंगलातून भटकलेले कोणतेही प्राणी आढळून आल्यास वन विभागाला कळवावे आणि त्यांच्या अधिवासात सोडण्यासाठी वन विभागाला मदत करावी असे आवाहन उपवनसंरक्षक राहुलसिंग तोलिया यांनी केले.