माजी आमदार अतुल देशकर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर “भाजपा ,तालुका सावलीचा उपक्रम”

माजी आमदार अतुल देशकर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर

“भाजपा ,तालुका सावलीचा उपक्रम”

माजी आमदार अतुल देशकर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर "भाजपा ,तालुका सावलीचा उपक्रम"

बाबा मेश्राम
सावली तालुका प्रतिनिधी
7263907273

*सावली*:: ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार ,जेष्ठ भाजपा नेते प्रा.अतुल देशकर यांच्या वाढदिवसानिमित्त आज दि.२७जुलै रोजी भारतीय जनता पार्टी तालुका सावली च्या वतीने स्थानिक कृषि उत्पन्न बाजार समिती सावली येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यात
ईच्छुक रक्तदात्यांनी रक्तदान हेच जीवनदान म्हणुन रक्त दान केले. रक्तदान शिबिरात भाजपा कार्यकर्ता सह 70 रक्तदात्यांनी रक्तदान केले,
भाजपा तालुका सावली च्या वतीने दरवर्षी माजी आमदार अतुल देशकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने( 27 जुलै ) रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते ,यावेळी सुध्दा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या रक्तदान शिबिराला.उत्सुर्फूत प्रतिसाद मिळाला .
भाजपा तालुका सावलीच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात भाजपा तालुका महामंत्री तथा नगरसेवक सतीश बोम्मावार, माजी जि प सभापती संतोष तंगडपल्लीवार, नगरसेविका निलम सुरमवार शहर.अध्यक्ष आशिष कार्लेकर, गौरव संतोषवार, , माजी सभापती छाया शेंडे,प्रकाश पा गडमवार,देवराव सा मुद्दमवार, माजी उपसभापती रविद्र बोलीवार,प्रविन सुरमवार,विनोद धोटे,किशोर वाकुडकर,राकेश गोलेपल्लीवार मयुर गुरुनले,आदर्श कुडकेलवार,निखिल सुरमवार, महिला शहर अध्यक्ष गुड्डी सहारे,सिंधु मराठे ,जीत्तु सोनटके,जित्तु चिताडे, मोतीराम चिमुरकर,अशोक नागापुरे आदीची उपस्थिती होती.
कोरोनाच्या दोन वर्षाच्या काळानंतर देशासह राज्यातील सर्व निर्बध उठाल्या नंतर सार्वजनिक कार्यक्रमाला परवानगी मिळाली, कोरोनाच्या काळात सुध्दा रुग्णांना रक्ताची आवश्यकता भासत होती त्यावेळी सुध्दा पक्ष,सामाजिक संघटना रक्तदान शिबिराचे आयोजन करीत होते, रुग्णांना रक्तांची गरज भासत असल्याने विविध रक्तगटाचे रक्त रक्तपेढी जमा केल्य जाते, “सर्व दानात रक्तदान श्रेष्ठ आहे, या उपक्रमास जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथील ब्लड bank च्या टिमने सहकार्य केले यात,रक्त संक्रमण अधिकारी डॉ अशोक तुमरेटी,रक्त वैद्यकीय अधिकारी प्रफुल्ल राऊत ,विजया मांदाळे परिचारिका ,गायत्री चिचघरे,निलेश सोनवणे,प्रमोद देशमुख, बंडु कुंभारे आदीचे सहकार्य लाभले .
..भाजपा तालुका सावली च्या रक्तदान शिबिर उपक्रमाचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे….