लॉयन्स क्लब गडचिरोली डिस्ट्रिक्ट अवॉर्ड आणि मल्टिपल अवॉर्ड ने सन्मानित
लॉ मंजुषा मोरे ठरल्या बेस्ट सेक्रेटरी
स्वप्निल श्रीरामवार
अहेरी तालुका प्रतिनिधि
मो न 8806516351
*नुकतेच लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234 एच 1 च्या वतीने जलाराम लॉन्स,गोंदिया येथे डिस्ट्रिक्ट अवॉर्ड सोहळा अंतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या लॉयन्स क्लबांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.*
*लायन्स क्लब हा वर्षभर विविध उपक्रम राबवून गरजूंना सेवा पुरवित असतो,अशाच उपक्रमांतर्गत डिस्ट्रिक्ट 3234 एच 1 द्वारे उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल लॉयन्स क्लब गडचिरोलीला डिस्ट्रिक्ट मेगा ऍक्टिव्हिटी अवार्ड, महिला सशक्तिकरण अवार्ड, बेस्ट सर्विस विजन ऍक्टिव्हिटी अवॉर्ड,बेस्ट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कॉन्टेस्ट अवॉर्ड, लॉयन ग्लोबल कॉजेस कलेक्टर सेट, लॉयन्स क्लब इंटरनॅशनल अप्रेसिएशन सर्टिफिकेट ग्लोबल सर्विस अवार्ड या सर्वोत्कृष्ट पुरस्कार सन्मानित करण्यात आले तसेच हा क्लब अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त क्षेत्रातील कार्याचा सर्वोत्कृष्ट पुरस्कारांचा सुद्धा तो मानकरी ठरला.*
*लॉयन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट अवॉर्ड सोहळा अंतर्गत बेस्ट झोन चेअरपर्सन म्हणून लॉ. शेषराव येलेकर यांना सन्मानित करण्यात आले तर बेस्ट लॉयन इमेज बिल्डिंग साठी मल्टिपल डिस्ट्रिक्ट सिल्वर अवार्ड तसेच बेस्ट सेक्रेटरी अवार्ड म्हणून लॉ. मंजुषा दिपक मोरे ह्यांना सन्मानित करण्यात आले*
*प्रांत 3234 एच 1 चे प्रांतपाल राजेंद्रसिंग बग्गा, विद्यमान प्रांतपाल श्रवण कुमार, नवनिर्वाचित उपप्रांतपाल लॉ. डॉ. रिपल राणे, माजी प्रांतपाल चंद्रकांत सोनटक्के, माजी प्रांतपाल डॉ राजे मुधोजी भोसले, माजी प्रांतपाल विनोद जैन,मेगा ऍक्टिव्हिटी चेअर पर्सन लॉ. विलास साखरे, ग्लोबल सर्विस चेअरपर्सन लॉ.निशिकांत प्रतापे, इत्यादींच्या हस्ते लायन्स गडचिरोली क्लबला सदर पुरस्कारानी सन्मानित करण्यात आले.*
*ह्यावेळी क्लबचे झोन चेअरपर्सन शेषराव येलेकर,सचिव मंजुषा मोरे, कोषाध्यक्ष महेश बोरेवार,प्रथम उपाध्यक्ष सतीश पवार, माजी अध्यक्ष तथा सिनेट सदस्या प्रा. संध्या येलेकर, दीपक मोरे, डॉ.सविता सादमवार इत्यादी सदस्य उपस्थित होते.*
**गडचिरोली लायन्स क्लबने शांतता पोस्टर स्पर्धा ,आरोग्य निदान व उपचार शिबिर, स्वच्छता शिबिर, दंत चिकित्सा व बालकांमधील कर्करोग जनजागृती शिबिर,रक्तदान शिबिर, मधुमेह तपासणी शिबिर,महिला सबलीकरण अंतर्गत तारुण्याच्या उंबरठ्यावर या विषयावार विद्यार्थिनीना मार्गदर्शन इत्यादी उपक्रम राबविले होते.*