माणगांव नगर पंचायत हद्दीतील शासनाने बांधलेले फूटपाथ कोणासाठी ?
✍सचिन पवार ✍
माणगांव तालुका प्रतिनिधी
📞८०८००९२३०१📞
माणगांव :-माणगांव नगर पंचायत हद्दीतील कचेरी रोड, मोर्बा रोड वरील शासनाने काही महिन्यापुर्वी पादचाऱ्यासाठी सुंदर व मजबूत असे फूटपाथ बांधलेले आहेत. फूटपाथ चालण्यासाठी योग्य असले तरी याच फूटपाथवर मच्छीवाले भाजीवाले, टपरीवाले त्याच प्रमाणे फेरीवाले यांचे अतिक्रमण पाहायला आपल्याला मिळत आहे.तसेच सुरक्षित फूटपाथ चालण्यास मोकळा असून देखील फूटपाथवर दुकानाच्या जाहिरातीच्या पाट्या, बोर्ड ठेवलेले आहेत, त्याच प्रमाणे फूटपाथ लगत दुचाकी वाहने रिक्षा, मिनिडोर या वाहनाच्या आड फेरीवाले व इतर व्यावसायिक फूटपाथवर बसून धंदा करत आहेत.
शासनाने बांधलेले फूटपाथ अतिक्रमीत झाल्यामुळे लोकांना फूटपाथवरून चालण्याऐवजी रस्त्यावरून चालावे लागत आहे. रस्त्यावरून चालणाऱ्या व्यक्तीचा अपघात होऊ शकतो. त्यामुळे भविष्यात होणाऱ्या अपघाताला जबाबदार कोण ? असा प्रश्न निर्माण होत आहे. मोर्बा रोड व कचेरी रोड वरील दोन्ही बाजूचे फूटपाथ व मुख्य बाजारपेठेतील रस्त्यालगत हातगाडीवाले, भाजीविक्रेते,कोलनी मच्छीवाले तसेच लहान मोठी वाहने दुकानासमोर लावून रस्ता पूर्णपणे चक्का जाम करत आहेत तसेच वातावरणात पूर्णपणे दुर्गधी पसरलेली आहे. त्यामुळे रस्त्यावरून येणारे जाणारे शाळा कॉलेजचे विध्यार्थी असो किंवा नागरिक त्याच प्रमाणे इतर वाहने यांना अडथळे निर्माण होत आहे. याचा पाठपुरावा करून माणगांव नगरपंचायत चे मा. मुख्याधिकारी, मा. तहसीलदार साहेब तसेच इतर शासनाने या सर्व बाबीकडे जाणीवपूर्वक लक्ष देऊन सदरच्या अडचणी अडथळे दूर करून देण्यास सहकार्य करावे अशी सामान्य जनतेचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे.