लोहारा येथे काही ग्रामस्थांचे एसटी बसच्या समोर रस्ता रोको आंदोलन

बाळू वाघ

मो: 7507414606 

जामनेर तालुका प्रतिनिधी

पाचोरा- ठिय्या आंदोलन करण्यात आले होते कारण की काही दिवसांपूर्वी त्यांनी पाचोरा बस डेपोच्या मा.अधिकाऱ्याला एक निवेदन दिलेला होता की लोहारा ते शेंदुर्णी बस सकाळी साडेसहा आणि शेंदुर्णी ते लोहारा साडेअकरा वाजता अशी बस सेवा चालू करण्यात यावी कारण की सकाळी जाणाऱ्या शाळेच्या मुला मुलींना फार त्रास भोगाव लागत होता प्रायव्हेट बसेस आणि काली पिली रिक्षा या माध्यमातून त्यांना शाळेत जाण्यास फार त्रास होत होता म्हणून लोहारात या ठिकाणी रस्ता रोको ठिया आंदोलन त्या ठिकाणच्या निलेश चौधरी, ज्ञानेश्वर राजपूत, ग्रामपंचायत सदस्य मा. ईश्वर देशमुख , तुषार पाटिल, राजू चौधरी,सागर कोळी , महेंद्र भाऊ, अक्षय देशमुख या सर्व ग्रामस्थांनी केल होत.

ग्रामस्थांनी त्या ठिकाणाहून राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अरविंद चितोडिया यांना फोन केला की दादा आपण तात्काळ या ठिकाणी या कारण की त्या ठिकाणच्या शाळेत जाणाऱ्या मुला मुलींना फार त्रास भोगावा लागत आहे यासाठी आज रस्ता रोको आंदोलन आम्ही केले आहे त्या ठिकाणी अरविंद चीतोडिया तात्काळ आले. आणि त्या ठिकाणी संबंधित बस डिपो च्या अधिकाऱ्यांशी बोलून त्यांना सांगितले की तात्काळ हे बस सेवा चालू करण्यात यावी असे अरविंद चीतोडीया बोलले आणि अधिकाऱ्यांनी सुद्धा आम्हाला शास्वती दिली की आम्ही येत्या आठ ते दहा दिवसांच्या आत लवकरच आम्ही ते बस सेवा चालू करू तुम्हाला आश्वासन देतो असे सांगितले त्याच ठिकाणी अरविंद चीतोदिया त्या रस्ता रोको यांनी आंदोलन करत्या ग्रामस्थांना समजावून आंदोलन तिथे सोडवल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here