कोलाड रोहा महामार्गावर मोठे भगदाड, जीवितहानी होण्याची शक्यता…

48

कोलाड रोहा महामार्गावर असणाऱ्या मोरीच्या गटाराला मोठे भगदाड,  यामुळे जीवितहानी होऊ शकते…

तेजपाल जैन

कोलाड विभाग प्रतिनिधी

मो: 8928847695

कोलाड :-मुंबई गोवा महामार्ग वरून रोहा कडे जाणाऱ्या वळणावर मध्यभागी असणाऱ्या गटारावर टाकलेल्या स्लॅबला खड्डा पडल्यामुळे अपघात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.मोटारसायकल चालवत असताना चाक अडकण्याची भीती आहे त्यामुळे अपघात होऊ शकतो दोन ते तीन वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या गटाराला खड्डा पडल्यामुळे लोकांमध्ये कामाबद्दल तीव्र नाराजी होताना दिसत आहे.त्यात मुंबई गोवा महामार्ग गेली कित्येक वर्ष रखडल्यामुळे लोकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

कोलाड रोहा महामार्ग लवकरात लवकर रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी सर्वसामान्य लोकांची आहे. यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहतुकीची कोढी होऊ शकत नाही कोलाड बाजूकडून रोहा मुरुड अलिबाग जाणारा रस्ता असल्याने या स्लॅबच्या पडलेल्या भल्यामोठया खड्यामुळे स्थानिक नागरिक संताप व्यक्त करताना दिसत आहेत.