माणगांव बाजारपेठेत आढळले अतिशय दुर्मिळ पिसोरी हरीण

सचिन पवार 

कोकण ब्युरो चीफ

मो: 8080092301

माणगांव :-चक्क माणगांव बाजारपेठ मध्ये आढळले अतिशय दुर्मिळ पिसोरी हरीणच पिल्लू बुधवार दिनांक २६ जुलै रोजी सकाळी ७ वाजता पुन्हा हा प्राणी या ठिकाणी आला असल्याची माहिती कृष्णाभाई गांधी यांनी दिली, तातडीने शंतनू व त्याचा सहकारी मित्र शुभांकर तेथे पोहोचले, पाहणी केली असता हा प्राणी “माउस डियर” म्हणजेच मराठीत “मूषक हरीण” किंवा “पिसोरी म्हणून ओळखेल जाणारे हरीण असल्याचे खात्रीपूर्वक कळले.

चारी दिशेने लोकवस्तीने गजबजलेल्या बाजारपेठ परिसरात हे अत्यंत लाजरे हरीण पुराच्या पाण्यामुळे चुकून अडकून राहिले असल्याचे निदर्शनास आले व आजूबाजूला भटक्या कुत्र्यांचा मोठा वावर आणि समोरील मुंबई-गोवा महामार्ग त्यामुळे हरीणाचा तात्काळ बचाव करणे गरजेचे असल्याने स्थानिक व गांधी परिवाराच्या मदतीनेच बचावकार्य सुरु करण्यात आले, बचावकार्यादरम्यान हे पिसोरी हरीण चक्क बाजारपेठेतील प्रजापती यांच्या राजश्री एम्पोरियम या कपड्यांच्या दुकानात शिरले, तिथे वन्यजीव अभ्यासक शंतनु कुवेसकर यांनी अथक प्रयत्नांनंतर हळुवारपणे पकडून वनविभागाची टीम दाखल होईपर्यंत साधारण १५ मिनिटे दुकानाच्या बंद खोलीत हरीणाला शांत ठेवले.

माणगांव शहरात गजबजलेल्या भरवसाहतीत आढळले हेच ते पिसोरी हरीण, वन्यजीव अभ्यासक शंतनु कुवेसकर व शुभांकर वनारसे सह स्थानिक गांधी परिवाराच्या सहकार्याने हरीणास सुरक्षित पकडल्यानंतर माणगांव वनविभाग वनपरिक्षेत्र अधिकारी अनिरुद्ध ढगे, वनरक्षक वैशाली भोर,अनिल मोरे आणि वाहन चालक विवेक जाधव यांनी त्याला पिंजऱ्यातून नेऊन जवळच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here