ज्येष्ठ नागरिक मंच कोपरगाव यांच्या वतीने विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप

104

संवत्सर येथील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप

सुनील भालेराव, अहिल्यानगर

 मो: 937012 7037

कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथे विद्यालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक श्री रमेश जी मोरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ नागरिक मंच कोपरगाव व Ad. आत्माराम जी जोशी यांच्या स्मृतिदिनानिमित्त जनता इंग्लिश स्कूल येथील गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप करण्यात आले.

या कार्यक्रम प्रसंगी सुरुवातीला विद्यालयाच्या स्कूल कमिटीचे जेष्ठ सदस्य आणि गोदावरी दूध संघाचे चेअरमन राजेश आबा परजणे साहेब यांनी या कार्यक्रमात प्रसंगीचे अध्यक्ष स्थान श्री एडवोकेट जयंतराव जोशी साहेब यांना भूषवण्यास सांगितले व गावाच्यावतीने ज्येष्ठ नागरिक मंच कोपरगाव यांचे आभार व्यक्त केले. अनुमोदन विद्यालयाच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तसेच स्थानिक सल्लागार समितीचे ज्येष्ठ सदस्य श्री चंद्रकांत मामा लोखंडे साहेब यांनी दिले . प्रास्ताविक विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री विजय जेजुरकर सर यांनी केले. यामध्ये पाहुण्यांचा परिचय व त्यांनी घेतलेल्या मोफत आरोग्य शिबिर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप मोफत गणवेश वाटप यांसारख्या उपक्रमाबद्दल सखोल अशी माहिती दिली. याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य केशवराव भवर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी जीवनात पुढे जायचे असेल तर सखोल अशी मेहनत व परिश्रम घ्यावे लागतील याविषयी सखोल असे मार्गदर्शन केले.

यानंतर विद्यालयाचे माजी विद्यार्थी डॉक्टर विलासराव आचारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले यामध्ये त्यांनी इयत्ता पाचवी ते अकरावीपर्यंत याच विद्यालयात अतिशय हलाखीच्या परिस्थितीमध्ये शिक्षण घेऊन पुढे कशा पद्धतीने ते डॉक्टर झाले याविषयी सखोलशी माहिती दिली आणि विद्यार्थ्यांना आपल्याला हेतू साध्य करायचं असेल तर कशा पद्धतीने जायचं याची सखोल अशी माहिती देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यानंतर एडवोकेट जयंत जोशी साहेब यांच्या पत्नी एडवोकेट स्मिताताई जोशी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

यानंतर विद्यालयाच्या स्थानिक सल्लागार समितीचे जेष्ठ सदस्य श्री संजय जी काळेसाहेब यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यानंतर जेष्ठ नागरिक मंच अध्यक्ष सौ सुदाभाभी कैलास ठोळे यांनी अतिशय सुंदर असं सत्यम शिवम सुंदरम हे गीत सादर केलं. यानंतर या कार्यक्रमाचे अध्यक्ष एडवोकेट जयंत जोशी साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी स्कूल कमिटी सदस्य बाळासाहेब बारहाते साहेब , ग्रामपंचायत चे उपसरपंच विवेक भाऊ परजणे साहेब दिलीपराव अबक सचिन भाऊ काळे सहाने टेलर्स ज्येष्ठ नागरिक मंच कोपरगाव चे डॉक्टर विजयराव बंब केशवराव भवर मिताली ताई जोशी दिपाली ताई जोशी डॉक्टर अरुण भांडगे साहेब हे मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री पवन कुमार सांगळे सर यांनी खूप मेहनत घेतली. शेवटी कार्यक्रमाचे आभार विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री भगवान शिंदे सर यांनी व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता केली. सूत्रसंचालन शिक्षिका श्रीमती नागरे मॅडम व श्री खेताडे सर यांनी प्रभावीपणे केले.